मालघरचा सुपुत्र महाराष्ट्राचा महाधिवक्ता

मालघरचा सुपुत्र महाराष्ट्राचा महाधिवक्ता

Published on

-rat८p१९.jpg-
P२५O०९३४१
अॅड. मिलिंद साठे
-
मालघरचे सुपुत्र ॲड. मिलींद साठे राज्याचे महाधिवक्ता
झळाळती कारकीर्द ; १८ व्या वर्षी पदवी, सात वर्षे बार अध्यक्ष, अनेक महत्त्वाचे खटले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : राज्याच्या महाधिवक्तापदासाठी कालच नियुक्त झालेले अॅड. मिलिंद साठे हे चिपळूण तालुक्यातील मालघर गावचे असून, मालघर येथील शाळेत शिकलेले विद्यार्थी ते राज्याचे महाधिवक्ता ही त्यांची झेप फक्त चिपळूण तालुक्यालाच नव्हे तर कोकणला ललामभूत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अॅड. साठे यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले.
अॅड. साठे यांचा कायदा क्षेत्रातील अनुभव दीर्घकाळचा आहे. मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून त्यांनी काम केले आहे. अॅड. वीरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर साठे यांची नियुक्ती झाली. कायदेतज्ज्ञ अशी साठे यांची ओळख असून, बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २०१४ ते २१ अशी सात वर्षे उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये त्यांनी मैलाचा दगड ठरतील, असे खटले चालवले आहेत. कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि अत्यंत महत्त्वाच्या केसिस तसेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. महापालिकेचे वकील म्हणूनही त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. साठे त्यांच्या कायदेविषयक कौशल्य आणि व्यावहारिक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहेत.
वयाच्या ३७व्या वर्षी त्यांना उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासंबंधी विचारणा झाली होती. कदाचित सर्वात कमी वयाचा न्यायाधीश म्हणून त्याचे नाव नोंदले गेले असते; पण त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारली नाही. तत्पूर्वी २००५ मध्ये साठे वरिष्ठ वकील झाले. २००७ मध्ये ट्रेड ऑर्गनायझेशन अॅंड कॉन्स्टिट्यूशनल सॉव्हरिनिटी ऑफ इंडिया या विषयावर डॉक्टरेट मिळवली. २०१४ ला त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला. बॉम्बे बार असोसिएशनच्या दीडशेहून अधिक वर्षाच्या इतिहासात आधी ब्रिटिश आणि नंतर पारसी आणि गुजराथी लोकांचे वर्चस्व होते. तिथे डॉ. मिलिंद साठे बॉम्बे बार असोसिएशनचे पहिले मराठी अध्यक्ष झाले. त्यांचे चौथी ते सहावीचे शिक्षण मालघर प्राथमिक शाळा, सातवी ते अकरावी रामपूर येथील मिलिंद विद्यालय आणि विज्ञानातील पदवीपर्यंतचे शिक्षण चिपळूणच्या दातार कॉलेजमध्ये झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हा त्यांचे वय फक्त १८ पूर्ण होते. गावातल्या शाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपद आणि अनेक वर्ष श्रीराम मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले.
---
चौकट
हा मोठाच बहुमान
राज्याचा महाधिवक्ता या पदावर झालेली नेमणूक हा मोठाच बहुमान आहे. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न या पदावर असताना करेन, अशी प्रतिक्रिया अॅड. साठे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
--
कोट
बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि अर्थातच थोरामोठ्यांचे आशीर्वाद यांच्या जोरावर कोकणातल्या छोट्याशा खेड्यातून मराठी माध्यमातून शिकून गेलेल्या या मुलाने मुंबईसारख्या महानगरीत कोणीही गॉडफादर पाठीशी नसताना स्वबळावर आपला जम बसवला, ही आम्हा कुटुंबीयांसाठी सार्थ अभिमानाची बाब आहे.

- संध्या साठे-जोशी, भगिनी, चिपळूण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com