गुहागर -तालुक्यात ६६० बंधाऱ्यांचे उद्दीष्ट

गुहागर -तालुक्यात ६६० बंधाऱ्यांचे उद्दीष्ट

Published on

गुहागरमध्ये ६६० बंधारे अडवणार पाणी
जिल्हा परिषदेचा उपक्रम; शून्य पैशातून उभे राहणार बंधारे
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ९ : तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींमार्फत ६६० बंधारे बांधण्यात येणार आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सध्या मिशन बंधारा हा उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शून्य पैशातून जिल्ह्यात लोकसहभागातून ८ हजार ४६० बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामधून कोट्यवधी लीटर पाणीसाठा होणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी राज्याच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पडतो; परंतु भौगोलिक परिस्थितीमुळे दरवर्षीच शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीमुळे पावसाचे पडणारे पाणी हे समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे पडणाऱ्या पावसाचा तसा पाणीटंचाईचा फायदा होत नाही. नदी, नाले यावर बंधारे बांधले तर पाणी अडवले जाईल. या धर्तीवर जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षापासून बंधारे बांधण्यास सुरवात केली आहे. दरवर्षी बंधारे बांधले जातात. शेवटी याचा परिणाम पाणीटंचाईच्या गावांवर झाला आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी आली आहे. पूर्वी जिल्ह्यात ३०० ते ४०० गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र सध्या हा आकडा १५० ते २०० तालुकांवर आला आहे.
यावर्षीसुद्धा जिल्हा परिषद मिशन बंधारे बांधण्याच्या कामाला लागली आहे. आत्तापर्यंत ६० बंधारे बांधण्यात आले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीला १० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, ८ हजार ४६० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेने शून्य पैशात हे बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी लोकसहभाग घेतला आहे. प्रत्येक गावात श्रमदान केले जाणार आहे तसेच बंधारा उभारण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.
------
चौकट
बंधारे बांधण्याचे ग्रामपंचायतींना उद्दिष्ट ः
तालुका ग्रामपंचायती बंधारे उद्दिष्ट
* मंडणगड ४९ ४९०
* दापोली १०६ १०६०
* खेड ११४ ११४०
* चिपळूण १३० १३००
* गुहागर ६६ ६६०
* संगमेश्वर १२६ १२६०
* रत्नागिरी ९४ ९४०
* लांजा ६० ६००
* राजापूर १०१ १०१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com