रत्नागिरी- अन्याय होऊनही महिलांनी कर्तव्य पार पाडले
rat9p26.jpg-
09585
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात व्याख्यात्या डॉ. सुचेता परांजपे यांना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार अंक भेट दिला. यावेळी डावीकडून उपप्राचार्य सुनील गोसावी, डॉ. माधव परांजपे आणि डॉ. कल्पना आठल्ये.
--------------
कालिदास व्याख्यानमाला-- लोगो
अन्याय होऊनही महिलांनी कर्तव्य पार पाडले
डॉ. सुचेता परांजपे ; स्त्री व्यक्तिरेखांचे चित्रण
रत्नागिरी, ता. ९ : महाभारतात सत्यवती, गांधारी, कुंती, माद्री, द्रौपदी (पांचाली), अंबा, अंबिका, अंबालिका अशी अनेक महिला पात्रे आहेत. यातील प्रत्येकीचा विवाह हा तिला आवडलेल्या नायकाशी झाला नाही, हे एक साम्य आहे. द्रौपदीने अन्यायाविरूद्ध आवाज उठवला; परंतु महाभारतातील या स्त्रिया एकप्रकारे अन्याय होऊनही सतत आपले कर्तव्य करत राहिल्या आणि म्हणूनच महाभारत घडले, असे प्रतिपादन डॉ. सुचेता परांजपे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेत ‘महाभारतातील निवडक स्त्री व्यक्तीरेखा’ या विषयावर त्या बोलत होत्या. सेमिनार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात रत्नागिरीकर श्रोते मंत्रमुग्ध झाले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. डॉ. परांजपे म्हणाल्या, गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून चूक केली; परंतु द्रौपदीने पांडव हे कौरवांचे दास झाल्यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी, अन्यायाविरूद्ध आवाज उठवला. गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती. तिला झाले शतपुत्र म्हणजे शंभर नव्हे तर भरपूर, खूप अशा अर्थाने संस्कृत अर्थ आहे. तिला खूप पुत्र झाले; परंतु कुरूक्षेत्रावरील युद्धात ते सर्वच्या सर्व मारले गेले. तेव्हा तिला माता म्हणून काय वाटले असेल, असे डॉ. परांजपे यांनी स्त्रीची भावना मांडली.
युद्धानंतर गांधारीचा शोक, तिची वाईट अवस्था, ज्यांचे ज्यांचे पुत्र, पती युद्धामध्ये मारले गेले अशा सर्व स्त्रियांचा शोक महाभारताच्या स्त्रीपर्वामध्ये वर्णिलेला आहे. मद्र देशाची राजकन्या माद्री हिचे पांडू राजाबरोबर लग्न झाले; परंतु त्यासाठी भरपूर धन भीष्मांनी पाठवले होते म्हणून तिचा विकत घेतलेली असा उल्लेख महाभारतात आहे. महाभारतात अनेक स्त्रीपात्रांच्या विवाहाच्या बाबतीत एकप्रकारे फसवणूकच झाली, असे डॉ. परांजपे यांनी सांगितले.
----------
चौकट १
विद्यार्थ्यांचा गौरव
भा. का. नेने स्मृती पारितोषिक व श्रीमती कमला फडके स्मृती पारितोषिक- मधुश्री वझे, वेदश्री बापट, मनस्वी नाटेकर, अमृता आपटे. सौ. ललिता घाटे पारितोषिक व प्रा. पूर्णिमा आपटे स्मृती पारितेषिक- मनस्वी नाटेकर; पं. दा. गो. जोशी स्मृती पारितोषिक- कल्पजा जोगळेकर. प्रश्नमंजूषा- प्रथम- पूर्वा खाडिलकर, वेदश्री बापट, पौर्णिमा ढोकरे, द्वितीय-ओंकार खांडेकर, साक्षी शेवडे, मधुश्री वझे, तृतीय- कनक भिडे, हिमानी फाटक, तेजस्विनी जोशी. अंत्याक्षरी स्पर्धा- प्रथम- मीरा काळे, साक्षी शेवडे, स्मितल बेंडे, द्वितीय-ओंकार खांडेकर, वेदश्री बापट, पूर्वश्री जावडेकर, तृतीय-कल्पजा जोगळेकर, दीप्ती गद्रे, पौर्णिमा ढोकरे, उत्तेजनार्थ- मनस्वी नाटेकर, पूर्वा खाडिलकर, चिन्मयी टिकेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

