तळेखोल बंधारा प्लेटअभावी आटला

तळेखोल बंधारा प्लेटअभावी आटला

Published on

09651

तळेखोल बंधारा प्लेटअभावी आटला

ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १० : पाणलोट योजनेअंतर्गत तळेखोल गावठाणवाडी येथील बांद्याकडे या ठिकाणी उभारलेल्या बंधाऱ्यावर अद्याप प्लेट बसवल्या नसल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. लोखंडी प्लेट बसविण्याची प्रक्रिया ग्रामपंचायतीकडून केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दोन महिने आधी जे काम व्हायला हवे होते, त्याकडे मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व जनावरांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी सांगितले, ‘सरपंच, उपसरपंच, सदस्यांना प्रत्यक्ष भेट देऊन या गंभीर प्रश्नाची माहिती दिली होती, तरीही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सध्या नव्याने सुरू असलेल्या बंधाऱ्यांच्या कामांनाही तत्काळ स्थगिती देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आधीच्या बंधाऱ्यांचा योग्य वापर आणि देखभाल न करता नवे बंधारे उभारण्याला काहीही अर्थ नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.’
या संदर्भात ग्रामस्थ लवकरच पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करणार आहेत. पंचायत समिती कार्यालय व तालुका कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर गंभीरपणे कार्यवाही करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी महादेव सावंत, गुरुदास दळवी, गणपत दळवी, प्रभाकर दळवी, कुसुम देसाई, दत्ताराम मिरजकर, फँटी सावंत, नरेश सावंत, केशव शेळके, नारायण सावंत, सदानंद शेटकर, महेंद्र सावंत, कृष्णा सावंत, पांडुरंग सावंत, श्रीकांत सावंत, राजेश सावंत, भागीरथी सावंत, प्रतीक्षा गवस, साधना गवस, नलिनी गवस, उर्मिला सावंत उपस्थित होत्या.
....................
प्लेट बसविण्यास दुर्लक्ष का?
यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर आरोप केले. ग्रामस्थांना पाण्याची गरज असताना ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. ग्रामसेवकही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात लवकरच पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com