लव्ह जिहाद विरोधी जनजागृती मोर्चा
लव्ह जिहादविरोधी जनजागृती मोर्चा
दापोलीत आयोजन ;प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १० : शहरात हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने लव्ह जिहादविरोधी जनजागृती मोर्चा काढण्यात आला. दापोलीतील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात नागरिक, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य सरकारने लव्ह जिहादविरोधी कठोर व स्वतंत्र कायदा लागू करावा, अशी मागणी आयोजकांनी या माध्यमातून केली. खोटी ओळख वापरून विवाह किंवा धर्मांतर घडवून आणल्याच्या कथित घटनांवर प्रभावी कारवाईसाठी कडक कायदे आवश्यक असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी केली. उत्तरप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशात अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तत्सम कायदा लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे सादर करण्यात आली. तसेच अशा प्रकरणांच्या तपासासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, पीडित महिलांना कायदेशीर, मानसिक सहाय्य मिळावे यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. दोषींवर कठोर शिक्षा आणि समाजात सातत्यपूर्ण जनजागृती मोहिमा राबवण्याची आवश्यकता आयोजकांनी अधोरेखित केली. मोर्चानंतर प्रदेशातील नागरिकांचे लक्ष आता राज्यसरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.
---
कोट
लव जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे, अशी आमची सरकारकडे आग्रही मागणी आहे.
- जया साळवी, नगरसेविका व महिला तालुकाध्यक्षा, भाजप

