दापोली-कै. डॉ. मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर ‘कै. कृष्णामामा महाजन’ स्मृतिपुरस्कार प्रदान
डॉ. मधुकर लुकतुके यांना
मरणोत्तर पुरस्कार
दाभोळ येथे १४ रोजी वितरण; आरोग्यक्षेत्रातील कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १०ः कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा चौदावा स्मृती पुरस्कार यंदा दाभोळ पंचक्रोशीत देवमाणूस म्हणून ओळखले जाणारे डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. १४ रोजी दाभोळ येथे आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे व मिहीर महाजन यांनी दिली.
२००१ ला मामांच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापित केलेल्या या प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात अप्रकाशित; पण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवले जाते. आजपर्यंत १३ मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर यंदा डॉ. लुकतुके यांची निवड केली असून, त्यांचे चिरंजीव केदार लुकतुके पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुरस्कारात सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असा समावेश असतो. डॉ. लुकतुके यांनी १९६० पासून तब्बल ६५ वर्षे दाभोळ परिसरात रुग्णसेवा केली. निदानाच्या विलक्षण क्षमतेमुळे आणि आर्थिक परवड नसलेल्या ग्रामीण रुग्णांवर मनःपूर्वक उपचार केल्यामुळे ते धन्वंतरीचा अवतार म्हणून ओळखले जाऊ लागले.
सरकारी नोकरी सोडून आयुष्य रुग्णसेवेला वाहणारे लुकतुके हे नव्वदीतही मार्च २०२५ पर्यंत दवाखान्यात कार्यरत होते. १९६० ते २०२५ म्हणजे तब्बल ६५ वर्ष ज्यांनी समर्पितपणे सामन्यांची आरोग्यसेवा केली ते डॉ. लुकतुके म्हणजे साक्षात धन्वंतरी देवतेचा अवतार आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा पुरस्कार महाजन प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार आहे. मामा महाजन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देण्याची ही परंपरा गेले १३ वर्षे सुरू असून, हे चौदावे वर्ष आहे. आजवर झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय पेट्रोल मंत्री रामभाऊ नाईक, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आदी दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली असून, या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

