रत्नागिरी- एक धाव मराठी भाषेसाठी

रत्नागिरी- एक धाव मराठी भाषेसाठी

Published on

rat10p17.jpg-
09743
रत्नागिरी : कोकण कोस्टल अर्धमॅरेथॉनची माहिती प्रसाद देवस्थळी यांनी दिली. यावेळी डावीकडून सचिन नाचणकर, प्रशांत आचार्य, संदीप तावडे आणि डॉ. राज कवडे.

एक धाव मराठी भाषेसाठी
कोकण कोस्टल अर्धमॅरेथॉन
सुवर्णसूर्यतर्फे ४ जानेवारीला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वामध्ये सर्व धावपटू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. जगातली कुठल्याही भाषेसाठी समर्पित पहिली अर्धमॅरेथॉन ठरणार आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनच्यावतीने ४ जानेवारीला ही मॅरेथॉन थिबापॅलेस ते भाट्ये या मार्गावर आयोजित केली असून, ५, १० आणि २१ किमीची ही मॅरेथॉन आहे. यामध्ये जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केलेला असेल, अशी माहिती सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. १२ राज्यांतील ३००हून शहरांमधून २२००हून अधिक फिटनेस टुरिस्ट रत्नागिरीमध्ये कोकण कोस्टल अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून येत आहेत. २१ किमीचा एकदिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्रकिनारी सांगता, ९ गावांमधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्रकिनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाला सर्वांपेक्षा वेगळं बनवतात, असे सांगितले.
सहभागासाठी २० तारखेपर्यंत नोंदणी करावी. स्थानिकांना ऑफलाईन नोंदणीची सुविधा आनंद सागर अपार्टमेंट, मजगाव रोड येथे कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफिसमध्ये केली आहे. सुहास ठाकूरदेसाई, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, अॅड. सचिन नाचणकर, प्रशांत आचार्य, डॉ. राज कवडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com