जिल्ह्यात ठाकरे सेनेचा भगवा फडकवा
swt103.jpg
09750
कुडाळः ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी निवड झालेल्या कृष्णा धुरी यांचे अभिनंदन करताना माजी आमदार वैभव नाईक व शिवसैनिक.
जिल्ह्यात ठाकरे सेनेचा भगवा फडकवा
वैभव नाईकः कुडाळात संभाव्य उमेदवार, पदाधिकाऱ्यांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १०ः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी करा, असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या संभाव्य उमेदवार बैठकीत आज येथे केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार आणि पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे झाली. कुडाळ तालुकाप्रमुखपदी कृष्णा धुरी, तालुका संघटकपदी सचिन कदम यांची निवड झाल्याने श्री. नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, अवधूत मालणकर, विभागप्रमुख दीपक आंगणे, मंगेश बांदेकर, बाळा कांदळकर, गंगाराम सडवेलकर, दत्ताराम उभारे, शैलेश विरनोडकर, राजेंद्र घाडीगावकर, नरेंद्र राणे, दशरथ मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘विकासाचे व्हिजन मांडणाऱ्या सत्ताधारी आमदार, खासदार यांनी गेल्या वर्षभरात तालुक्याचा कोणताही विकास केला नाही. याउलट महायुती सरकारकडून शाळा, हायस्कूल बंद पाडल्या जात आहेत. जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत नवीन नळयोजनेचे एकही काम सत्ताधारी आमदार, खासदार पूर्ण करू शकले नाहीत. कुडाळमध्ये रस्ते खड्डेमय झाले आहेत. आरोग्य सुविधाही ढासळली आहे. आम्ही सुरू केलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजमधून नागरिकांना चांगल्या सुविधा देखील सत्ताधारी देऊ शकत नाहीत. नागरिकांना गोवा-बांबोळी येथे उपचारासाठी जावे लागत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांचा रोष वाढत आहे. शिवसेनाच जनतेचे प्रश्न सोडवू शकते. त्यासाठी सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा आवाज उठवावा. त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

