डीबीजे महाविद्यालयात ज्युडो प्रशिक्षण केंद्र
‘डीबीजे’ महाविद्यालयात
ज्यूदो प्रशिक्षण केंद्र
चिपळूणः येथील ‘डीबीजे’ महाविद्यालयातील जिमखान्यामध्ये सुरू केलेल्या क्रीडा भारती ज्यूदो प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सचिव अतुल चितळे, खजिनदार संजीव खरे यांनी श्री हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. क्रीडा भारती उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा रमा करमरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आहे. या प्रसंगी क्रीडा भारतीच्या उपाध्यक्षा नीशा आंबेकर, खजिनदार सई महाडिक, सोनाली वरंडे, तपस्विनी नाटेकर, युवा संघटक समीर राऊत, संयोजक ललित चितळे उपस्थित होते. वरंडे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
----------
प्रश्नमंजूषा स्पर्धेत
संतोषी चव्हाण प्रथम
मंडणगडः मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तोंडली ग्रामपंचायतीत काल (ता. ९) ग्रामीण भागात आगळावेगळा व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. महिलांना गावातील स्थानिक, तसेच सामाजिक राजकीय विषयांवरील प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी उत्तरे देत ग्रामीण सशक्तीकरणाला अनोखी दिशा दिली. महिलांच्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत गुणांकन पद्धतीनुसार विजेत्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये प्रथम क्रमांक संतोषी चव्हाण यांनी पटकावला. त्यांना सरपंच चंद्रभागा जाधव यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक पायल घरवे यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक जयवंती सकपाळ यांना मिळाला. या उपक्रमामुळे तोंडली ग्रामपंचायतीत महिलांचा सहभाग वाढीस लागला असून, सामाजिक प्रश्नांची जाण, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यास चालना मिळाली. ग्रामीण भागात महिलांच्या सबलीकरणासाठी घेतलेला हा अभिनव उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. या वेळी ग्रामपंचायत अधिकारी अक्षय चोपडे, तोंडली ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
----------
शैक्षणिक साहित्य
काँग्रेसतर्फे वाटप
चिपळूण ः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे सामाजिक बांधिलकी जपणारे सेवा उपक्रम राबवण्यात आले. यूपीए सरकारच्या काळात ‘मनरेगा’, माहिती अधिकार, अन्नसुरक्षा कायदा, आदिवासी हक्क कायदा, शिक्षणाचा हक्क यांसारख्या जनहितकारी कायद्यांमुळे गरीब, कष्टकरी व उपेक्षित घटकांना आधार मिळाला. त्या स्मृतिप्रीत्यर्थ व त्याच विचारधारेतून जिल्हा काँग्रेसने समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य दिले. उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्यावतीने तालुक्यातील तिवरे गावातील कातकरी समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही अडचण येऊ नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. तसेच गरजवंत वस्तीतील महिलांना हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी ऊबदार ब्लँकेटचे वाटप करून काँग्रेस पक्षाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करण्यात आली. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, मोरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

