अमर खामकरांना कोकणरत्न पुरस्कार

अमर खामकरांना कोकणरत्न पुरस्कार

Published on

-rat१०p१९.jpg-
२५O०९७४७
अमर खामकर
----
अमर खामकरांना
कोकणरत्न पुरस्कार
पावस ः लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रयोगशील शेतकरी अमर खामकर यांची स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे कोकणरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा १३ला सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई येथील आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई मराठी पत्रकार भवनात हा कार्यक्रम होणार आहे. स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला वरिष्ठ पत्रकार सचिन कळझुनकर, धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड आदी उपस्थित राहणार आहेत.

समर्थ मंदिरात आज
अखंड नामस्मरण
रत्नागिरी : शहरातील श्री विठ्ठल मंदिर आवारातील श्री स्वामी समर्थ मंदिरात सलग दुसऱ्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरूवारी (ता. ११) सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत बारा तास अखंड नामस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या पहाटे ५ वा. महाराजांची षोड्शोपचार पूजा, ६.१५ वा. परिसरातील सर्व देवदेवतांना निमंत्रण, ६.३० वा. वीणांसहित वाद्यवृंद पूजा आणि सकाळी ७ वा. वीणा तार छेडून नामस्मरणाला सुरुवात होईल. दिवसभर नामस्मरण चालू राहील. सायंकाळच्या आरतीने ७ वा. सांगता होईल. ज्या भक्तांना वीणा घेऊन नामस्मरण करायचे असेल त्यांना वेळेनुसार संधी देण्यात येईल. नामस्मरणाचा कार्यक्रम सर्व स्वामीभक्त, सर्व भाविकांकरिता खुला असून, सर्व भाविकांनी आपल्या वेळेनुसार नामस्मरणाचा लाभ (अगदी एक मिनिटापासून पुढे बारा तासापर्यंत कितीही वेळ) घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मिशन लोकशाहीत
निवड झालेल्यांचा सत्कार
गुहागर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथी ते पाचवी व सहावी ते सातवी या दोन गटातील शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती प्राथमिक स्तरावर माहिती व्हावी यासाठी तालुकास्तरीय मिशन लोकशाही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये केंद्रानुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तालुक्यातील २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये मंगळवारी सत्कार करण्यात आला. परीक्षेमध्ये इ. ४ थीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरा नरसाळे, शरयू पाते, श्रेया साळवे, प्रीत चिवलकर, स्वराज राठोड, भूषण लवटे. ५ वीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रूही जोशी, श्रेया मांडवकर, मनाली मूकनाक, आयुष फटकरे, आदेश दवंडे, कौस्तुभ गुरव, ओवी गोंधळी, देवेश्री पाटील. ६वीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा पाटील, आयुष रावणग, श्रेयश सनगरे, नील वनगे, श्रावणी कुळये, प्रचिती भोसले. ७वीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्णव बामणे व वृषभ गिजे, श्रेया बामणे, वेदांत बारस्कर, धनश्री वाघे, सानवी राणे, कार्तिकी सुर्वे या सर्व विद्यार्थ्यांचा गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com