पावसमधील पर्यटकांना कांदळवन सफारीची प्रतीक्षा

पावसमधील पर्यटकांना कांदळवन सफारीची प्रतीक्षा

Published on

-rat१०p२२.jpg-
P२५O०९७६८
पावस ः गौतमी नदीपात्रात बोटीतून पर्यटकांना सफर घडवली जाते.
----
पर्यटकांना कांदळवन सफारीची प्रतीक्षा
पावसमधील महिला देतात बोटींगची सेवा; परवानगी मिळाल्यावर सुरुवात, गाळ उपशाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १० ः सध्या पावस परिसरामध्ये अनेक धार्मिक ठिकाणी व समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशगुळे, गावखडी, पूर्णगड समुद्रकिनाऱ्याबरोबरच पावसचे स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटीमधून गौतमी कांदळवन फिरण्यासाठी व्यवस्था गेल्या वर्षी सुरू झाली. त्याला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षीसाठी कांदळवन परिसर फिरण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा येथील महिलागटाला आहे.
पावस परिसरामध्ये समुद्रकिनारा, धार्मिक स्थळे, गडकिल्ल्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांबरोबरच शैक्षणिक सहलीही येत आहेत. या व्यतिरिक्त येथील पर्यटकांना गौतमी खाडीमध्ये कांदळवन परिसरामध्ये बोटिंगची व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील महिलागटाला एक व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले. गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळला. पहिल्या वर्षामध्ये अडीचशे ते तीनशे पर्यटकांनी याचा लाभ घेतला; परंतु या खाडीमध्ये गाळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरतीच्या वेळी बोटसफारी करता येते. येथील खाडीपरिसर अतिशय सुंदर असल्याने अनेकांची पावले या कांदळवन पर्यटनाकडे वळत आहेत; परंतु या व्यवसायाला अद्याप संबंधित खात्याने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ असली तरी परवानगी नसल्याने कांदळवन सफारीचा आनंद त्यांना लुटता येत नाही.
-------
कोट
या बोटिंगमुळे आम्हा महिलांना व्यवसायाचे साधन निर्माण झाले. मागील वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. पूर्णवेळ पर्यटकांना खाडीमधून कांदळवन परिसर फिरून आणण्याकरिता खाडीच्या गाळाच्यासंदर्भात मत्स्य संवर्धनमंत्री नीतेश राणे यांच्याकडे गाळ उपशाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गाळ उपसल्यानंतर कांदळवन पर्यटनाला चांगली गती मिळू शकेल. सध्या या व्यवसायाला अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे अनेक पर्यटक माघारी जात आहेत.

- सुरेखा बावस्कर, गौतमी कांदळवन पर्यटन बोटीच्या प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com