एलईडी व्हॅनमार्फत शासकीय योजनांची जनजागृती

एलईडी व्हॅनमार्फत शासकीय योजनांची जनजागृती

Published on

- rat१०p२६.jpg-
२५O०९८१६
रत्नागिरी ः शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी काढलेल्या फेरीचे उद्‍घाटन करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल.

‘एलईडी व्हॅन’मार्फत योजनांची जनजागृती
जिल्हा माहिती कार्यालय; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृतीला सुरुवात झाली. या व्हॅनला जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी हिरवा झेंडा दाखवला.
रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या विविध असणाऱ्या योजना यांची माहिती या एलईडी व्हॅनद्वारे देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधन, कन्यादान योजना, स्टँडअप् योजना, कृषी स्वावलंबन योजना, दलित वस्ती सुधारणा कार्यक्रम, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता योजना, स्वाधार योजना यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर कृषी, आरोग्य, वनविभाग, महसूल विभाग, कौशल्य विकास आदींचा समावेश आहे. अमली पदार्थापासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसदलाने मिशन फिनिक्सअंतर्गत मोहीम सुरू केली आहे. सायबर गुन्हे घडू नयेत, फसवणुकीपासून नागरिकांनी दूर राहावे याबाबत जनजागृतीपर देण्यात येणारे संदेश, सायबर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते त्यापासून काय काळजी घ्यावी, याबाबतही या जनजागृती मोहिमेत समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com