पित्त आणि अॅसिडिटीचे वाढते प्रमाण
आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक---------लोगो
(५ डिसेंबर टुडे १०२)
पित्त आणि अॅसिडिटीचे वाढते प्रमाण
पित्ताचा त्रास गेल्या दोन-तीन दशकात बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे. पित्तशामक गोळ्यांच्या अतिवापराचे काही नको ते परिणामही दिसून येत आहेत. म्हणूनच आज याविषयी थोडे जाणून घेऊया.
- rat११p८.jpg-
25O09922
- डॉ. सुनील कोतकुंडे
---------
गॅस्ट्रायटिस म्हणजे पोटाच्या आतील आवरणाला होणारा दाह किंवा जळजळ. ती अकस्मात किंवा दीर्घकालीन असू शकते. काहीवेळा आम्लपित्तामुळे होणाऱ्या सततच्या दाहामुळे आवरणाला जखमा किंवा अल्सरदेखील होऊ शकतात.
कारणे-एकविसाव्या शतकात जगभरात गॅस्ट्रायटिसच्या प्रमुख करणामध्ये बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि लठ्ठपणा, चुकीच्या खाण्याच्या सवयी जसे अवेळी खाणे, बराच वेळ उपाशी रहाणे, भूक नसताना खाणे, भुकेपेक्षा जास्त खाण्याने पित्त वाढते. पर्यावरणीय व प्रादेशिक कारणात पाण्यातील प्रदूषण जसे उत्तर भारतात पाण्यातील अर्सेनिकचे प्रमाण. आर्थिक स्थिती-निम्न असणाऱ्यामध्ये स्वच्छ पाण्याच्या अभावात h pylori जंतूच्या संक्रमणानेही पित्त वाढते. अतिप्रक्रिया केलेले अन्न खाल्याने पित्त वाढते. वेदनाशामक औषधांचा अनिर्बंध वापर, मद्यपान, धूम्रपान, तांबाखू, गुटखा, पान यांचे व्यसन तसेच चहा व कॉफीचे अतिसेवन, मानसिक ताणतणाव
लक्षणे ः पोटात किंवा छातीत जळजळ किंवा दुखणे, अपचन, पोट फुगणे, ढेकर, पोट लगेच भरल्यासारखे वाटणे, मळमळ, उलट्या, भूक मंदावणे, पोटात जखम ः अल्सर असल्यास रक्ताची उलटी किंवा काळे शौच होणे.
निदान ः दिनचर्या, जीवनशैली व औषधांच्या वापराची सखोल माहिती आणि इतिहास
H. Pylori चाचणी – रक्त, श्वास आणी शौचाची तपासणी
एन्डोस्कोपी – लक्षणे जास्त गंभीर किंवा दीर्घकाळ असल्यास अन्ननलिकेतून दुर्बीण घालून तपासले जाते.
उपचार ः प्रदूषण असल्यास पाणी उकळून गाळून प्यावे. अवेळी खाणे भूक नसताना खाणे, जास्त खाणे टाळावे, मसालेदार तेलकट, अति प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. H pylori प्रादुर्भाव आढळल्यास प्रतिजैविकांचा कोर्स व पित्तशामक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण करावीत
वेदनाशामक गोळ्यांचा परस्पर अनिर्बंध वापर टाळावा. पित्तशामक औषधाचा डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित वापर करावा. जीवनशैलीत समतोल आणावा व ताणाचे व्यवस्थापन करावे. गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने एन्डोस्कोपी व प्रसंगी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
प्रतिबंध कसा करावा-जीवनशैली सुधार
• मद्य, तंबाखू, गुटखा, पान, उत्तेजक पेय आणि धूम्रपान टाळणे.
• तिखट, तेलकट पदार्थ टाळणे. अवेळी, गरजेपेक्षा जास्त व झोपेच्याआधी जड जेवण टाळणे.
• जेवण शक्यतो ठराविक वेळी घ्यावे
• ताणतणाव नियंत्रणात ठेवणे
• स्वच्छता सांभाळणे व पाणी निर्जंतूक करून पिणे
• औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे
• पित्तशामक गोळ्या घेत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे
जोखमीच्या बाबी आढळल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्या जसे
• रक्ताची उलटी किंवा काळे शौच
• अनपेक्षितरित्या वजन घटणे
• सतत व वाढत जाणारी वेदना
• वारंवार उलट्या होणे
• खाण्यात, गिळण्यात अडचण येणे
सारांश – गॅस्ट्रायटिस अत्यंत सामान्य त्रास असून, प्रदूषण, जंतूसंसर्ग, वेदनाशामक औषधे, ताण आणि जीवनशैली या प्रमुख कारणांचा समूह आहे. अनिर्बंध व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्यांचा वापर टाळा. जीवनशैलीत बदल करताना क्रियाशील रहा. दिनचर्येत नियमितता आणा. वेळच्यावेळी संतुलित आहार घ्या आणि अतिप्रक्रिया केलेले अन्न टाळा.

