अंध व्यक्तींसाठीच्या टोपीला प्रथम क्रमांक

अंध व्यक्तींसाठीच्या टोपीला प्रथम क्रमांक

Published on

- rat११p४.jpg-
२५O०९९१६
ध्रुवी बागवे
---
ध्रुवी बागवेची ‘स्मार्ट टोपी’ अव्वल
अंध व्यक्तींसाठी उपयुक्त ; तालुका विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः संगमेश्वर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक दिव्यांग ६ ते ८ एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल देवळेच्या ध्रुवी बागवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने अंध व्यक्तींसाठी उपयुक्त अशी टोपी बनवली आहे. अंध व्यक्तींना चालताना, गर्दीतून वाट काढताना, जिना चढताना, उतरताना मोठी अडचण होत असते. त्या अडचणीवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून तिने टोपी बनवली आहे. अंध व्यक्तींसाठीची टोपी सतत समोरच्या वस्तू तपासत असते. ठराविक अंतरावर अडथळा आल्यास टोपीत असलेल्या सेन्सरला समजते. टोपीमधील स्पीकर बीप असा आवाज करतो व व्हायब्रेशन करतो. त्यामुळे अंध व्यक्तीला ते कळते व तो दिशा बदलतो. अंध व्यक्ती रस्त्यावरून सुरक्षित चालू शकते. काठीशिवाय अडथळे पार करू शकते. गर्दीत अपघात टाळता येतात. अंध व्यक्तीचे स्वावलंबन होते. विज्ञानाचा वापर करून आपण समाजातील दुर्बल व्यक्तींची चांगल्याप्रकारे मदत करू शकतो, हा उद्देश या टोपी बनवण्यातून असल्याचे ध्रुवीने सांगितले. या यशाबद्दल पंचक्रोशीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com