

09923
जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचा निकाल जाहीर
वालावलकर प्रथम, बामणीकर द्वितीय तर शेळके व निकम तृतीय
कणकवली, ता, ११ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा कासार्डे येथील केंद्रावर झाली होती. यात पराग नीलकुमार वालावलकर यांनी प्रथम, आनंद लक्ष्मण बामणीकर यांनी द्वितीय तर संदीप जनार्दन शेळके व मिलींद सुरेश निकम यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थीचे व जिल्ह्यातील कार्यरत पंचाचे एक दिवसीय शिबीर रविवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिमखाना सावंतवाडी जिमखाना हॉल येथे होणार आहे.
परीक्षेत परेश नीलकुमार वालावलकर, भक्ती चंद्रकांत काणकेकर, संतोष अपना कांबळे, समर्थ सतीश तुळसकर, नीलेश बुधाजी फोंडेकर, ऋषिकेश शंकर खटावकर, जयेश सुनील फाटक, यशवंत सहदेव परब, सुरज सुभाष महाले, दीपक सुरेश चव्हाण, चंद्रकांत रामचंद्र काणकेकर, मंदार मनाहर डुंबरे, प्रसन्न विजयकुमार सावंत, विशाल विजय कदम, दिवाकर मोहन पवार, अनिलकुमार जयवंत जमदाडे, माधुरी रामदास खराडे, नवनाथ चंद्रकांत काणकेकर, प्रसाद पांडुरंग देसाई, संदेश गुरूनाथ पाठकर, वैष्णवी चंद्रकांत काणकेकर, पूजा गणेश पाताडे, सचिन बाळकृष्ण तेंडुलकर, महेश गुणाजी सावंत, वैष्णव विद्याधर सावंत, गौरव शरद सांडव, स्वप्नील संतोष महाले, भूषण सच्चिदानंद आंगचेकर, जानू बाबू पाटील, प्रियांका दिनानाथ कोरगांवकर, उमेश लबू पाटकर, गोरश विष्णू वायंगणकर, श्रीकांत हंकारे, अमिता अरविंद राणे, रूपेश गंगाराम बांदेकर, राधाकृष्ण श्रीधर परब, अंकुश जिवाजी पारकर हे उत्तीर्ण झाले आहेत.
उत्तीर्ण परीक्षार्थीचे सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो, उपाध्यक्ष व माजी आमदार अजित गोगटे, दिलीप रावराणे यांनी अभिनंदन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.