श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
- rat११p१७.jpg-
P२५O०९९५२
रत्नागिरी : श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मंदिरात महाआरती करताना बंधूभगिनी, भाविक. (छाया : संतोष नलावडे, रत्नागिरी.)
---
संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : तेली आळी येथील श्रीसंत संताजी जगनाडे महाराज मंदिरात श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा झाला. या वेळी महाराजांची पूजा करण्यात आली. दिवसभर विविध कार्यक्रम झाला. सायंकाळी महाआरती करण्यात आली. महाआरतीला सर्व स्तरातील भाविक मोठ्या उत्साहात सामील झाले.
या प्रसंगी आयटीआय प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांचा संक्षिप्त स्वरूपात इतिहास सांगितला. या प्रसंगी अध्यक्ष किशोर पावसकर, सचिव उदय बसणकर, प्रशांत गावखडकर, सुरज गावखडकर, अभी गावखडकर, बाळा नाचणकर, रहाटे बंधू, विजय रसाळ, पुजारी राहुल कोतवडेकर, संदीप कोतवडेकर, ज्ञानदीप कोतवडेकर, शिवसेना शिंदेगटाचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शाखाप्रमुख राहुल रसाळ, भाजपचे शहराध्यक्ष दादा ढेकणे, भाजपच्या महिला आघाडीच्या महिला नेत्या सुचिता नाचणकर, तेली महिला गटाच्या भाभी नाचणकर, संपदा रहाटे, राजश्री गावखडकर, कन्नवी पावसकर, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज सेवासंस्थेचे अध्यक्ष संदीप उर्फ बावा नाचणकर, सचिव शरद कोतवडेकर, प्रदीप दांडेकर, अजित लांजेकर आदी उपस्थित होते.

