निवती किल्ला घेतोय मोकळा श्वास
swt116.jpg
09967
निवतीः येथील किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
निवती किल्ला घेतोय मोकळा श्वास
‘दुर्ग मावळा’चा पुढाकारः स्वच्छता मोहीम घेतली हाती
संदीप चव्हाणः सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ११ः सिंधुदुर्गाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेला निवती किल्ला अखेरच्या घटका मोजत आहे. ऐतिहासिक काळात शत्रू सैन्यांची आक्रमणे, वेढे, तोफांचा भडिमार सहन करता करता याची मोठी पडझड झाली होती; मात्र नंतरच्या काळात झालेल्या दुर्लक्षामुळे याच्या तटबंदी, बुरुजासह परिसराला रानकेळी, जंगली झाडी झुडपांचा वेढा पडला आहे. या वेढ्यातून किल्ल्याला मुक्त करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.
सिंधुदुर्गात आलेले पर्यटक, दुर्गप्रेमी शाळांच्या सहलीतील विद्यार्थी मालवणमधील सिंधुदुर्ग, देवगडमधील विजयदुर्ग याचप्रमाणे किनारीकोट अशी ओळख असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याला आवर्जून भेट देतात. या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजवटीत हा प्रमुख किनारी किल्ला म्हणून ओळखला जायचा. यावर अनेक आक्रमणे झाली. पुढच्या काळात याला दुर्लक्षाचा सामना करावा लागला. इतर प्रमुख किल्ल्यांप्रमाणे याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे याला जंगली झाडी झुडपांचा मोठ्या प्रमाणात वेढा पडला. परिसरात गवत वाढल्याने तसेच काटेरी झाडी झुडपातून फिरताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. सिंधुदुर्गात दुर्ग संवर्धनासाठी नावलौकिक असलेल्या दुर्ग मावळा प्रतिष्ठानने जिल्ह्यातील इतर गडकोट किल्ल्यांप्रमाणेच किल्ले निवतीला प्राधान्य देत संवर्धन आणि स्वच्छतेचे कार्य हाती घेतले आहे. या स्वच्छता मोहिमेत ज्ञानेश्वर राणे, यतिन सावंत, प्रसाद पेंडूरकर, साईप्रसाद मसगे, हेमलता जाधव, समिल नाईक, गणेश नाईक, शिवप्रसाद मुळीक आदींनी सहभाग घेतला.
मागील वर्षी अनावश्यक काटेरी झाडी झुडपे हटवल्यानंतर पुन्हा किल्ल्याचा मुख्य महादरवाजा या झाडाझुडपांच्या जोखडातून मुक्त केला आहे. यामुळे किल्ल्याला पुन्हा एकदा प्राचीन गतवैभव प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. यापुढेही आठवड्यातून एकदा अशाच प्रकारे मोहीम राबवत हा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्याचा निर्धार दुर्ग मावळा सदस्यांनी व्यक्त केला. यापुढील मोहिमेत मोठ्या खंदकाची स्वच्छता करण्यासाठी पाऊल टाकले जाणार आहे. किल्ल्याचे अस्तित्व जपताना आणि पर्यटनासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले.
चौकट
किल्ल्यावर झाडांची पुनर्लागवड करणार
या ठिकाणाची काटेरी आणि अनावश्यक झाडी झुडपे, गवत हटवल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या झाडांची पुन्हा लागवड करण्याचा मानसही दुर्गमावळा प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे. या परिसरात जांभूळ, सुरू, कण्हेर, बोगनवेल, चिंच यांसारख्या प्रचंड वाऱ्याच्या माऱ्यापुढे तग धरून राहणाऱ्या झाडांचे रोपण केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

