स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा दबदबा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा दबदबा

Published on

swt113.jpg
09964
सावंतवाडी ः रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेतील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विजेते विद्यार्थी.

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा दबदबा
रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धाः ९० विद्यार्थी मेरिट अॅवार्डचे मानकरी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत भरभरून यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये तब्बल ९० विद्यार्थ्यांनी मेरिट अवॉर्ड मिळवत वेगवेगळ्या पुरस्कारांवर नाव कोरले.
​कोलाज मेकिंग कॉम्पिटिशन ः तिसरी-आद्या कुंभार (चौथी), चौथी-प्रार्थना नाईक (आर्ट मेरिट अवॉर्ड व चषक), अधृत गोवेकर (कांस्य), पाचवी-वरद राणे (सुवर्ण), सातवी-हर्ष साटेलकर (सुवर्ण), अस्मी प्रभूतेंडोलकर (कांस्य). सहावी-निधी शिर्के (कांस्य), दुसरी-मिहिरा खटावकर, सावी शिरसाट, नवेली जाधव (सुवर्ण).
​कलरिंग कॉम्पिटिशन ः पहिली-प्रांशी सावंत व पारस साधले (सुवर्ण), दुसरी-नवेली जाधव, सावी शिरसाट, मिहिरा खटावकर, पर्णिका देसाई (सुवर्ण), श्रवी पावसकर (आर्ट मेरिट अवॉर्ड आणि चषक). तिसरी-कुशल सबनीस, राधिका शेटकर (सुवर्ण), चौथी-वेद बेळगावकर, स्वरा वालावलकर, परिधी नाईक, हिताली गावडे, नाविन्या कोरगावकर, अवधूत चितारी (सुवर्ण), अधिश गोवेकर (रौप्य), पाचवी-नीलया शिंदे (सुवर्ण), सहावी-राबिया जमादार (फायस्टार ब्रीलियंट अवॉर्डसह स्केचबूक, ग्रफिट पेन्सिल व रौप्य). याच गटात सक्षम ओटवणेकर, निधी शिर्के, प्रत्युशा घोगले, गौरीश परब, ऋतुजा पेडणेकर यांनी सुवर्ण, अवनी शेर्लेकर यांनी रौप्य, सातवी-श्री कोरगावकर (आर्ट मेरिट अवॉर्ड व चषक), हिना सारंग, तनिष्क पवार व पूर्वी आरोलकर (सुवर्णपदक).
फिंगर अँड थम मेकींग कॉम्पिटिशन ः पहिली ः अर्णव पाटकर (सुवर्ण), प्रिन्सी राजपुरोहित (उत्तेजनार्थ व सरप्राइज गिफ्ट), दुसरी-सावी कुडतरकर, श्रवी पावसकर (सुवर्ण), तिसरी-रुद्र देसाई, सायली बांदेकर (सुवर्ण), आद्या कुंभार (कांस्य). चौथी-आधिश गोवेकर (सुवर्ण), पाचवी-फेथ फर्नांडिस (एक्सलंट एफर्ट अवॉर्डसह वूडन मनी पिगी बँक व कांस्यपदक), सई नाईक (सुवर्ण). सहावीहिना बथानी रौप्य व कांस्य पदक, सातवी-हिना सारंग (रौप्य), मास्क मेकिंग कॉम्पिटिशन ः पहिली-पारस साधले (कांस्य), दुसरी-विवान सावंत (सुवर्ण), वैदेही कुडाळकर (रौप्य), तिसरी- राधेय मोरजकर (सुवर्ण), चौथी-श्रीहान मुंज व सहावी- सक्षम ओटवणेकर (रौप्य). ​हस्ताक्षर स्पर्धा ः दुसरी-सलोनी हावळ (सुवर्ण), मिहिरा खटावकर (रौप्य), जय साटम (उत्तेजनार्थ व सरप्राइज गिफ्ट). तिसरी-दर्ष राणा (सुवर्ण), वल्लभ राऊळ, अभिनव गवस (रौप्य), अवधूतराज चव्हाण (कांस्य). सहावी-अवनी शेर्लेकर (सुवर्ण), माझ पटेल (रौप्य), ध्यानी बथानी (कांस्य). सातवी-पूर्वी आरोलकर (सुवर्ण). कार्टून मेकिंग कॉम्पिटिशन ः दुसरी-सतिश्र्वरन तेवर (कांस्य), तिसरीतील निधी पेडणेकर व चौथीतील प्रार्थना नाईक यांनी सुवर्णपदक पटकावले. पाचवी-कुशल तांडेल (सुवर्ण), सहावी-सरस नाईक (सुवर्ण), राबिया जमादार (रौप्य), भुवन दळवी (कांस्यपदक). सातवी-तनिष्क पवार (कांस्य).
स्केचिंग कॉम्पिटिशन ः दुसरी-आराध्या बांदेकर (रौप्य), चौथी-सार्थक मालवणकर (रौप्य), सहावी- भुवन पुंडलिक (सुवर्ण), राबिया जमादार, पृथ्वीराज गवस (कांस्य). कॅरिकेचर कॉम्पिटिशन ः चौथी-सार्थक मालवणकर (कांस्य). टॅटू मेकिंग कॉम्पिटिशन ः तिसरी-राधेय मोरजकर व रुद्र देसाई (रौप्य), अरमान गवंडी (कांस्य), चौथी-सार्थक मालवणकर (सुवर्ण), प्रार्थना नाईक (रौप्य).
​सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना सुषमा पालव यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यशस्वी झालेले नव्वद विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवडले गेले आहेत. त्याचप्रमाणे रंगोत्सव सेलिब्रेशनतर्फे प्रशालेस ‘ग्लोबल स्कूल अवॉर्ड’ जाहीर केले गेले. शिक्षिका पालव यांना ‘जॅक्सन पोलॉक अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. संस्थापक रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com