देवस्थान जमिनींवरील सर्व कर माफ करा

देवस्थान जमिनींवरील सर्व कर माफ करा

Published on

swt119.jpg
09990
सावंतवाडीः येथील नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांना भास्कर राऊळ यांनी निवेदन दिले. यावेळी बाळा डागी, सखाराम शेर्लेकर व इतर.

देवस्थान जमिनींवरील सर्व कर माफ करा
मंदिर महासंघाची मागणी; सावंतवाडी तहसिलदारांमार्फत शासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ः ​महाराष्ट्र मंदिर महासंघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थानांना दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावरील मुद्रांक आणि नोंदणी शुल्क तसेच सर्व प्रकारचे शुल्क आणि कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नावे येथील नायब तहसीलदार रवींद्र निपाणीकर यांच्याकडे याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
महासंघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘राज्यातील मंदिरे, देवस्थान आणि धार्मिक, धर्मदाय संस्था कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता केवळ सामाजिक, धार्मिक आणि जनसेवा कार्य करतात. अनेक भक्त सेवेच्या भावनेतून मंदिरांना जमिनी दान करतात. तसेच, मंदिरांना शेती, भक्तनिवास, पायवाट अशा आवश्यक गरजांसाठी जमीन खरेदी करावी लागते. या जमिनींचे हस्तांतरण केवळ धार्मिक आणि सामाजिक हितासाठी केले जाते आणि यामध्ये देवस्थानचा कोणताही आर्थिक नफा किंवा व्यावसायिक हेतू नसतो. सध्या मंदिरांना मिळालेल्या किंवा खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरणाचे मूल्यांकन कंपनी, सहकारी संस्था यांप्रमाणे आकारले जाते, जे अनुचित आणि भक्तांच्या भावनेचा अनादर करणारे आहे, असे निवेदनात नमूद आहे. मंदिरे ही उद्योग, व्यापार किंवा खाजगी लाभासाठी नसल्यामुळे, या हस्तांतरणावरील सर्व शुल्क आणि कर पूर्णपणे माफ केल्यास मंदिरांवरील आर्थिक भार कमी होईल आणि धार्मिक, सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळेल. यापूर्वी काही प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्कात जी अंशतः व नाममात्र सूट देण्यात आली आहे, ती अपुरी आहे. त्यामुळे शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० या संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. देवस्थानांना दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी केलेल्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारावरील कंपनी, सहकारी संस्थांप्रमाणे आकारले जाणारे सर्व शुल्क, कर पूर्णपणे माफ करावे तसेच शासन निर्णयाद्वारेही मंदिरांना या संदर्भात संपूर्ण करसवलत प्रदान करावी.’
यावेळी भास्कर राऊळ, बाळा डागी, सखाराम शेर्लेकर, संपत दळवी, दत्ताराम सावत, शंकर निकम, प्रकाश मालोंडकर, गणेश पेंढारकर, चंद्रकांत बिले, शिवराम देसाई आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com