डॉ. आंबेडकर यांना जामसंडेत अभिवादन

डॉ. आंबेडकर यांना जामसंडेत अभिवादन

Published on

डॉ. आंबेडकर यांना
जामसंडेत अभिवादन
देवगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या ६९ व्‍या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍ताने जामसंडे येथील सम्‍यक प्रबोधिनी या मंडळाने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रदीप कदम यांनी अभिवादन रॅलीबाबत काय उद्देश असावा, याबाबत सखोल विवेचन केले. मंडळाचे माजी अध्यक्ष एम. के. जामसंडेकर, अध्यक्ष विलास जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी परिचय करून दिला. यावेळी देवगड तालुका सेवा संघाचे सचिव सुनील जाधव, नगरसेविका मनीषा जामसंडेकर, उपसचिव संदीप जाधव, सपना जाधव, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, सोनाली जाधव, नीतेश जाधव, सुरेश जाधव आदी उपस्थित होते. पंकज जाधव यांनी आभार मानले.
.................
सावंतवाडीत शनिवारी
नेत्र चिकित्सा शिबिर
सावंतवाडीः येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या वतीने ४० वर्षांवरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी सर्व प्रकारचे नेत्रदोष तपासणी शिबिर शनिवारी (ता. १३) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत भटवाडी सावंतवाडी येथे आयोजित केले आहे. शिबिर पूर्णपणे मोफत असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले आहे.
...................
पोंभुर्ले परिसरात
माकडांचा उपद्रव
तळेरेः देवगड तालुक्यातील पोंभुर्ले आणि आसपासच्या कोर्ले, धालवली व मालपे या नदीकिनारील गावांमध्ये वानर (माकड) यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि विविध उन्हाळी-पावसाळी पिके घेणाऱ्या या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, या उपद्रवामुळे हजारो एकर जमीन ओसाड पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग फार मोठ्या चिंतेत सापडला आहे. वनविभागाने या माकडांचा व वानरांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाच्यावतीने केली आहे.
.................
पर्यटकांच्या सुरक्षेची
काळजी घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरीः गोव्यातील हडफडे येथील क्लबमध्ये ६ डिसेंबरला आग लागल्याची घटना घडली होती. प्रथमदर्शनी ही आग सिलेंडरच्या स्फोट होऊन भडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत घडलेली मनुष्यहानी विचारात घेता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे चालक व मालक यांच्यासाठी वास्तव्यास येणारे पर्यटक तसेच तिथे काम करणारे कामगार यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट, होम स्टे यांचे चालक व मालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com