-नवे विषय, दमदार सादरीकरणाने स्पर्धेत रंगत

-नवे विषय, दमदार सादरीकरणाने स्पर्धेत रंगत
Published on

-rat११p१५.jpg
२५O०९९४३
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेच्यावेळी प्रयोग संपल्यानंतर कलाकारांनी भेटण्यासाठी रसिकांची गर्दी
---
राज्य नाट्यस्पर्धा ---लोगो

नवे विषय, दमदार सादरीकरणाने स्पर्धेत रंगत
रसिकांकडून पोचपावती; १ लाख ३६ हजारांचा महसूल प्राप्त, पाच नाटके हाऊसफुल्ल
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ ः कोकणातल्या माणसाला नाट्य नवं नसतं; तो लहानाचा मोठा होतानाच पारावरच्या नाटकाचा रंग त्याच्या आयुष्यात पाझरतोच. पारावरच्या नाटकांचे हे रंगरूप आता राज्यशासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ६४व्या हौशी मराठी नाट्यस्पर्धेतून बहरत आहे. नाटकवेड्या येथील कलाकारांच्या कलेला राजाश्रय मिळतो हेही थोडके नाही. या स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीत अनेकविध नाटकातून विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या नाटकांना येथील रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. या प्रतिसादामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे.
येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १० नोव्हेंबरला प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील १८ नाट्यसंस्था सहभागी झाल्या. काही नाटकांना हाऊसफुल बोर्ड लागला. या स्पर्धेत शासनाला १ लाख ३६ हजार ३७० रुपये महसूल प्राप्त झाला. विविध विषयावर भाष्य करणाऱ्या संहितांच्या प्रयोगाला ९ हजार ७४१ रसिकांनी दाद दिली. यावर्षीच्या मराठी हौशी राज्यस्पर्धेतून दिग्दर्शक-लेखकांनी विविध विषयांच्या संकल्पनाचे प्रयोग सादर केले. पारंपरिक कथा, जागाजमीन, भ्रष्टाचार, निराधारांना आधार, समाजसेवा, पर्यावरण, राजकीय, खून, संतवाणी, कामगारांच्या व्यथा, देशसेवा, कौटुंबिक, विनोदी नाट्य, संस्कृती, काल्पनिक कथांची जोड संहितांमधून देण्यात आली होती. कलाकारांचे आशयगर्भ-सहजाकलनीय संवाद उत्कंठा वाढवणारे होते. या नाटकांमधून काही तांत्रिक अडचणी रसिकांना जाणवल्या. यावर्षी पाच नाटकं हाऊसफुलमध्ये रंगली. यावर्षी अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा या नाटकांच्या चारही बाजू वेगळ्या धाटणीच्या करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक-संस्थांनी केला. शासनाच्या या उपक्रमांचे रंगकर्मींकडून कौतूक होत आहे. शासनाचा हा उपक्रम वृद्धिंगत व्हावा, अशी अपेक्षाही ज्येष्ठ रंगकर्मींकडून केली जात आहे.
---------
चौकट
नाटकांची तिकीटविक्री
दर्यावर्दी प्रतिष्ठान-पालशेत (ता. गुहागर) या संस्थेच्या नाटक- ‘अकल्पित’ यांना पहिले नाट्यपुष्प सादर करण्याचा मान मिळाला. त्याची तिकीटविक्री ७ हजार ४० रुपये होती. खल्वायनचे मंगलाक्षता हाऊसफुल झाले. त्याची विक्री १३ हजार ९८० रुलये, खरडेवाडी क्रीडा मंडळाच्या इम्युनिटी दी व्हॉईस ऑफ टॉलरन्सची विक्री- ७ हजार ३१५ रुपये, श्रीरंगचे येऊन येऊन येणार कोणची विक्री- ८ हजार ८६०, नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळाच्या ऑक्सिजन नाटकाने तिकीटविक्रीचा राज्यात उच्चांक केला. त्याची तिकीटविक्री १७ हजार ३८० इतकी झाली. प्रायोगिक थिएटर्सच्या तिनसानची विक्री ५ हजार ५४५ रुपये, समर्थ रंगभूमीचे अग्निपंखची विक्री १५ हजार ४०० रुपये, श्रीदेव गणपती ऑफ धामापूर अॅण्ड मारुती ऑफ माखजनचे सुखाशी भांडतो आम्हीची विक्री ७२८५ रुपये, संकल्प कलामंचच्या कांचनमृगची विक्री ४१३५ रुपये, लक्ष्मीकांत विविध कार्यकारीच्या अनपेक्षितटी विक्री ३४६० रुपये, शिवाई पतसंस्थेचे एक्स्पायरी डेट- २७६० रुपये, सम्राट फाउंडेशनच्या तृतीयपंथी पुरुष- २८८५ रुपये, कोतवडे माजी विद्यार्थीसंघाचे जन्मवारी- ३०५० रुपये, स्टार थिएटर्सचे तू पालनहारी-१४ हजार २१५ रुपये (हाऊसफुल्ल), सुमती थिएटर्सचे नमान- ६६०० रुपये, वीरशैव समाजचे ईठ्ठलाचे ११ हजार ९४५ रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com