देवगड सरपंचांच्या टिमची परुळे ग्रामपंचायतीला भेट

देवगड सरपंचांच्या टिमची परुळे ग्रामपंचायतीला भेट

Published on

swt1116.jpg
10026
परुळे बाजारः देवगड तालुक्यातील सरपंचांच्या गटाने येथील ग्रामपंचायतीला भेट दिली.

देवगड तालुक्यातील सरपंचांच्या
गटाने परुळे ग्रामपंचायतीला भेट
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १२ः देवगड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या गटाने परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेत पाहणी केली.
यामध्ये कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हाणकर, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, तळवणे सरपंच गोपाळ लमये, टेंबवली सरपंच हेमंत राणे, ग्रामपंचायत अधिकारी गुणवंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदीप प्रभू, माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू, शंकर घोगळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सरपंच आंबडपालकर यांनी स्वागत केले. परुळे बाजार ग्रामपंचायतीने राबविलेल्या काथ्या युनिट, तालुका प्लास्टिक संकलन युनिट, वॉटर एटीएम, सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्रमांची माहिती या गटाला देण्यात आली. या सर्व उपक्रमांचे देवगड तालुका सरपंच समितीने कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com