गिर्यारोहक अल्पेश सोलकरला ''कोकणरत्न'' पदवी पुरस्कार

गिर्यारोहक अल्पेश सोलकरला ''कोकणरत्न'' पदवी पुरस्कार

Published on

अल्पेश सोलकरला
‘कोकणरत्न’ पुरस्कार
रत्नागिरी, ता. ११ ः संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते-मलदेवाडी सुपुत्र गिर्यारोहक अल्पेश सोलकर यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे ‘कोकणरत्न’ पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले भटकंती, गिर्यारोहण आणि गडकिल्ले संवर्धन कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे कोकणरत्न पदवी पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जावे तसेच इतिहास, भूगोल प्रत्यक्षात अनुभवावा, हाच उद्देश अल्पेशचा आहे. गडकिल्ले भटकंती करताना आलेल्या चांगले-वाईट अनुभवावरून अल्पेश यांनी वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले. पुरस्कार सोहळा शनिवारी (ता. १३) सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे करण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com