अणुस्कुरातील जांभळीचा झऱ्याचे पुनरुज्जीवन
-rat११p३७.jpg-
P२५O१००२९
राजापूर ः स्वच्छता आणि गाळ उपसा झाल्यानंतर जांभळीचा पाण्याच्या झऱ्यामध्ये झालेला पाण्याचा साठा.
---
काही सुखद---लोगो
विद्यार्थ्यांकडून ‘जांभळी’ झऱ्याला नवजीवनदान
खापणे महाविद्यालयाचा उपक्रम; अणुस्कुरातील झाडाझुडूपांचीही स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः तालुक्यातील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येरडव गावच्या माथा परिसरातील आणि अणुस्कुरा घाटातील डोंगररांगांमध्ये वाहणाऱ्या जांभळीच्या झरा परिसरातील जंगलझाडीची साफसफाईसह स्वच्छता करून गाळ उपसा केला. त्यामुळे जांभळीचा झरा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी वाहून नेण्यासाठी उपयुक्त झाला आहे. विद्यार्थ्यांनी जांभळीच्या पाण्याचा बारमाही वाहणारा झरा पुनरुज्जीवित करण्यासह जतन अन् संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
खापणे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर येरडव येथे झाले. गतवर्षी झालेल्या शिबिरामध्ये खापणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अणुस्कुरा घाटातील सातवाहनकालीन ऐतिहासिक उगवाई मंदिर (अणुस्कुरा) ते येरडव मार्ग दुरुस्त केला होता. यावर्षीच्या शिबिरातही सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवण्यात आले. येरडव गावच्या माथ्याशी आणि घाटपरिसरामध्ये जांभळीचा पाण्याचा झरा, पायरीचे पाणी, सुरणीचे पाणी, धोंडीचे पाणी असे अनेक बारमाही वाहणारे नैसर्गिक जलस्रोत असल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत, भरत कदम, दयानंद सावंत, उमेश दळवी यांच्याकडून मिळाली. त्या आधारे अणुस्कुरा घाटाच्या डोंगररांगांतील जंगलामध्ये असलेल्या नैसर्गिक झऱ्यांचे पुनरुज्जीवनासह जतन अन् संवर्धनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम शिबिरार्थींनी हाती घेतला. जांभळीच्या पाण्याच्या वाहत्या झऱ्याची स्वच्छता करून पाणीसाठा वाढावा या दृष्टीने गाळ उपसाही केला.
----
कोट
सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची, पायवाटांची, शुद्ध पाण्याचे झरे, वनसंपदा, पशुपक्ष्यांचे किलबिलाट याची माहिती देऊन सह्याद्री पर्यटनाची गोडी लावल्यास सह्याद्रीलगत असणाऱ्या या गावातील पर्यटन वाढून रोजगार वाढेल. त्यासाठी या ऐतिहासिक पायवाटा पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. नव्या तरुणाईला या वाटा दाखवून देणे ही काळाची गरज आहे. त्यावेळी नैसर्गिक झऱ्यांचे जतन अन् संवर्धन झाल्यास पाणीटंचाईची भीषणता कमी होण्यास उपयुक्त ठरणार आहे.
--डॉ. विकास पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभाग
---
दृष्टिक्षेपात
* विशेष श्रमसंस्कार शिबिरातील काम
* बारमाही झऱ्याचे संवर्धन
* गाळ उपशामुळे पाणीसाठा वाढेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

