वर्ग सजावट स्पर्धेने सर्जनशीलता वाढीस

वर्ग सजावट स्पर्धेने सर्जनशीलता वाढीस

Published on

-rat११p३४.jpg-
२५O१०००३
रत्नागिरी : बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये सजावट केलेल्या वर्गासह विद्यार्थी, परीक्षक.
-----
सजलेल्या वर्गात स्पर्धेची उमेद
बसणी हायस्कूलमध्ये प्रथमच स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : तालुक्यातील बसणी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेच्या जी. एम. शेट्ये हायस्कूलमध्ये प्रथमच वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, स्वच्छता, सौंदर्यदृष्टी, समूहभावना व स्पर्धात्मकता आदींचा विकास झाला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक इ.१०वी, द्वितीय ९वी, तृतीय ५वी आणि उत्तेजनार्थ: प्रथम इ. ७वी, द्वितीय इ. ८वी आणि तृतीय इ. ६वी व विशेष पारितोषिक इ. १०वीला फिरता चषक देण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी व निवृत्त डीवायएसपी विलास भोसले यांनी ५२०० रुपयांची बक्षिसे जाहीर केल्यामुळे स्पर्धेला अधिक उत्साह लाभला.
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गांसाठी स्पर्धा झाली. मूल्यांकनासाठी एकूण १६ निकष निश्चित करण्यात आले होते. बोलक्या भिंती, बोलके विद्यार्थी, नीटनेटका विद्यार्थी संकल्पनेची निवड, विषयवार कोपरे, आकर्षक फळा सजावट, टाकाऊपासून टिकाऊ, वर्गनियम, स्वच्छता व मांडणी, बाकांची रचना, वर्गाचे वार्षिक नियोजन, वाढदिवस कोपरा, वर्ग घोषवाक्ये, एकंदरीत प्रभाव, सर्जनशीलता असे निकष होते.
-------
कोट
वर्ग सजावट स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये समूहभावना, स्वावलंबन, वर्गाबद्दलची आपुलकी तसेच सौंदर्यदृष्टी स्पष्टपणे वाढल्याचे दिसून आले. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र मनापासून सहभाग नोंदवला. स्पर्धेमुळे शाळेचा अंतरंग उजळून निघाला, वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले.
-प्रसाद गवाणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com