दापोलीत २६६७ लाभार्थ्यांना घरकुल

दापोलीत २६६७ लाभार्थ्यांना घरकुल

Published on

दापोलीत २६६७ लाभार्थ्यांना घरकुल
गावतळे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळत असून, मंजुरीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात तालुक्यास एकूण दोन हजार ६६७ घरकुले मंजूर झाली होती. तर २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात २२१ घरकुलांना मंजुरी मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पक्के घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंजूर घरकुलांपैकी अनेक लाभार्थ्‍यांची बांधकामे पूर्णत्वास जात आहेत, तर काही घरकुले प्रगतिपथावर आहेत. संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समिती स्तरावर निर्देशानुसार कामे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी वेळेवर जमा होणे, तांत्रिक पडताळणी वेगाने होणे आणि बांधकामकामांना गती मिळणे या गोष्टींसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही समजते. दापोली तालुक्यातील घरकुल योजनांचे प्रभावीपणे नियोजन करून अधिकाधिक कुटुंबांना यातून लाभ मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सुनील कांबळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
रत्नागिरी : माहेर संस्थेच्या संस्थापिका, सिस्टर लुसी कुरियन (दीदी) यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित व माहेर संस्था, रत्नागिरीचे प्रकल्पप्रमुख सुनील कांबळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात करण्यात आले. सिस्टर लुसी कुरियन यांनी माहेर संस्थेची स्थापना केली. त्यांनी समाजातील अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित लोकांना सामाजिक प्रवाहात आणण्याचे काम केले. कुरियन यांना ३५० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांच्या विचारांचे पुस्तक सुनील कांबळे यांनी लिहिले आहे. पुण्यातील वडगाव शेरी, माहेर मुख्य शाखेच्या सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सिस्टर लुसी कुरियन, माहेर संस्थेचे पदाधिकारी हिराबेगम मुल्ला, अनिरुद्ध गडांकुश व देशभरातील माहेर संस्थेचे शाखाप्रमुख उपस्थित होते.

पालेकोंड शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश
मंडणगड : तुळशी केंद्राच्यावतीने माहू येथे आयोजित हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये पालेकोंड शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत आपली दमदार छाप पाडली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची बीटस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. स्पर्धेत श्रवण माळी याने गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कार्तिक खांबे याने उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर अजिंक्य माळी याने थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली. रुद्र माळी याने ५० मीटर धावणी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. चारही विद्यार्थ्यांची बीटस्तरीय कबड्डी संघात निवड झाली आहे.

निकम विद्यालयात स्नेहसंमलेन
सावर्डे : सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन १२ व १३ डिसेंबरला विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. १२ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मांडणी करण्यात आलेल्या विविध प्रदर्शन दालनाचे उद्‍घाटन होणार आहे. उद्‍घाटनाला आमदार शेखर निकम, महेश महाडिक, सरपंच समीक्षा बागवे, प्रशांत निकम आदी उपस्थित राहणार आहेत. १३ ला सकाळी साडेनऊ वाजता उच्च माध्यमिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com