बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरी

बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरी

Published on

-rat११p२१.jpg
25O09971
मंडणगड : घराचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने चोरून अस्ताव्यस्त टाकलेले साहित्य.
----------
पालवणीत भरदिवसा फ्लॅट फोडला
किमंती ऐवजावर चोरट्याचा डल्ला ; पोलिसांसमोर आव्हान
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ११ ः मंडणगड शहरातील पालवणी फाटा पोलिस चेकपोस्ट परिसरातील नथुराम प्लाझामधील बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्याने किमंती ऐवजावर डल्ला मारला. या संदर्भातील तक्रार १० डिसेंबर रोजी मंडणगड पोलिस ठाण्यात नोंदवली गेली आहे.
फिर्यादी विजय शशिकांत पिंपळकर (वय ३७, मुळगाव बाणकोट, सध्या पालवणी फाटा, मंडणगड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नथुराम प्लाझातील रूम क्र. २०९ मध्ये भाडेतत्वावर वास्तव्यास आहेत. ते १० डिसेंबरला नेहमीप्रमाणे कामावर गेले. दुपारी २ ते ३:३० या वेळात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील साहित्य आणि कपडे अस्ताव्यस्त करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लांबवली. चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे दागिने- ४ ग्रॅम वजनाची कानातली रिंग, मुलांची २ ग्रॅम वजनाची कानातली, ३.३० ग्रॅम वजनाची नथ तसेच चांदीचे दागिने वाळे ३ जोड, कंबरेच्या साखळ्या ३ जोड, पैंजण २ नग त्याचबरोबर रोख रक्कम अंदाजे चार ते साडेचार हजार रुपये चोरी झाले. कामावरून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
---
चौकट
सजग राहण्याचे आवाहन
परिसरात कुणी अनोळखी व्यक्ती रेंगाळताना दिसल्यास त्यास आळा घालणे, घर किंवा फ्लॅट दीर्घकाळ निर्जन ठेवू नये तसेच शक्य असल्यास सीसीटीव्हीसारखी आधुनिक सुरक्षासाधने बसवावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com