चोविस वर्षानंतर डिसेंबर महिन्यात पारा ६ अंशापर्यंत
-rat११p४५.jpg-
P२५O१००७०
दापोली ः दापोलीतील किनाऱ्यावर थंडीच्या हंगामात दाखल झालेले सीगल पक्षी.
--------
दापोलीत २४ वर्षानंतर पारा सहा अंशापर्यंत
डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका; हापूस आंब्याला मोहोर येण्यास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
दापोली/पावस, ता. ११ ः मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्रच थंडीचा कडाका आहे. मागील तीन दिवसात पारा सतत खाली घसरत असून, दिवसाही हवेत गारवा जाणवत आहे. मागील २४ वर्षांत दापोलीत जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यातच पारा सहा अंशापेक्षा खाली गेलेला होता. तर डिसेंबर महिन्यात अशी नोंद यापूर्वी चार वेळाच झालेली आहे. आज ६.२ अंश सेल्सिअसइतकी नोंद झाली आहे.
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये पुढील काही दिवस शीतलहरी वाहणार आहेत. उत्तरेकडील हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून, त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवरही जाणवत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होत आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्रच थंडीचा कडाका वाढलेला आहे. हे वातावरण आंब्याला पोषक असून, मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील आंबा बागायतदार यांनी आंबा फवारणीला सुरुवात केली आहे. थंडीचा जोर कायम राहिला तरच त्याचा फायदा बागायतदारांना होणार आहे. थंडीचा कडाका कायम राहिल्यास पुनर्मोहर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रातील नोंदीनुसार, मागील तीन दिवसात पारा १ ते ३ अंशानी खाली घसरलेला आहे. आज पारा ६.२ अंशाची नोंद झाली. काल (ता. १०) पारा ७.२ अंश नोंद होती तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आहे. मागील २४ वर्षांतील कोकण कृषी विद्यापीठाकडील हिवाळ्यातील नोंदी पाहता यंदा डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोली तालुक्यात पारा सर्वात कमी नोंदल्याच्या घटना जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात आहेत; मात्र डिसेंबर महिन्यात १३ डिसेंबर १९९९ रोजी ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्यापूर्वी १९८७ मध्ये डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी नोंद झाली होती. त्यावर्षी सलग तीन दिवस १८, २०, २१ डिसेंबर रोजी अनुक्रमे ५.९, ५.७, ५.९ अंश तापमान नोंदले गेले होते. गेल्या दोन दशकात २०१० मध्ये ७.६ अंशापर्यंत पारा घसरल्याची नोंद होती. त्यानंतर पारा ८ ते ९ अंशात होता.
------
कोट
रत्नागिरी जिल्ह्यात २००२ नंतर वातावरणात बदल जाणवत आहेत. त्यानुसार डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवू लागला आहे. पूर्वी जानेवारीमध्ये पारा सर्वाधिक खाली येत असे.
- डॉ. विजय मोरे, ग्रामीण कृषी मोसम सेवा, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
-------
कोट
यंदा उशिरापर्यंत पाऊस असल्यामुळे आंबा बागांची परिस्थिती वेगळी झाली होती; परंतु अचानकपणे थंडीने सुरुवात केल्यामुळे काही प्रमाणात चांगले वातावरण तयार होत आहे.
- आशुतोष अभ्यंकर, आंबा बागायतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

