टेम्पो-एसटी बस अपघातात चौघे जखमी
-rat११p४८.jpg-
P२५O१००८८
लांजा ः साटवली मार्गावरील अपघातग्रस्त टेम्पो-एसटी बस.
---
टेम्पो-एसटी अपघातात चौघे जखमी
साटवली मार्गावरील घटना ; वाहनांचे मोठे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ११ ः टेम्पो व एसटी बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातामध्ये टेम्पो चालकासह चौघेजणं जखमी झाले आहेत. हा अपघात लांजा-साटवली मार्गावर साटवली डंगाचा कोपरा येथे घडला.
फिरोज ईकबाल शेख (वय ३८, रा. वेंगुर्ला-आरवली) असे गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यासह टेम्पोमधील आणखी तिघेजण जखमी झाले आहेत. त्यात सलमाना फिरोज शेख (वय ३५), योगेश रमाकांत राऊळ व योगिनी योगेश राऊळ यांचा समावेश आहे. त्या सर्वांना लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी चालकाला अधिक उपचारासाठी ओरस येथे पाठविण्यात आले. लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा आगाराची साटवली-लांजा एसटी बस साटवली येथून लांजाच्या दिशेने येत होती. एसटी बस गोळवशी येथील एका अवघड वळणावरील डंगाचा कोपरा येथे समोरून आलेल्या टेम्पोला धडकली. हा टेम्पो देवीहसोळ (ता. राजापूर) येथे यात्रोत्सवाला जात होता. फिरोज शेख हे टेम्पो चालवत होते. देवीहसोळ येथे यात्रा असल्याने लांजाहून दुकानाचे साहित्य टेम्पोमधून नेण्यात येत होते. दोन्ही वाहनांची धडक एवढी भीषण होती की, टेम्पोच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. टेम्पो चालक आतमध्येच अडकून पडला होता. मागे बसलेले प्रवासीही जखमी झाले होते. अपघात घडताच एसटी प्रवासी आणि ये-जा करणार्या इतर वाहन चालकांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला अथक प्रयत्नाने बाहेर काढले व सर्व जखमींना उपचारासाठी लांजा रुग्णालय येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची पाहणी केली. अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

