नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या इस्रो दौऱ्यासाठी प्रयत्न
-rat१२p१५.jpg-
२५O१०२०२
रत्नागिरी : नगरपालिकेच्या दामले विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी महती मराठी भाषेची प्रकाशन करताना मुख्याधिकारी वैभव गारवे, डॉ. शिरीष शेणई, प्रा. सुधाकर मुरकुटे, भगवान मोटे आदी.
-----------
विद्यार्थ्यांच्या ‘इस्रो’ अभ्यासभेटीसाठी प्रयत्नशील
वैभव गारवे ः दामले विद्यालयाचे स्नेहसंमेलन, गुणवंताचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्षी इस्रो अभ्यासभेटीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव गारवे यांनी केले. शहरातील पालिका शाळा क्र. १५ दामले विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कार्यक्रमात बोलत होते.
व्यासपीठावर माजी विद्यार्थी डॉ. शिरीष शेणई, प्रशासनाधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, मुख्याध्यापक भगवान मोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. डॉ. शेणई म्हणाले, अभ्यासाबरोबरच खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमही महत्त्वाचे आहेत. स्नेहसंमेलनाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घ्यावा व पुन्हा नव्या उत्साहाने अभ्यासाला सुरुवात करावी. या कार्यक्रमानिमित्त दामले विद्यालयातील माझे शाळेचे पूर्वीचे आनंददायी दिवस आठवले.
प्रशासनाधिकारी मुरकुटे यांनी दामले विद्यालय ही रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जास्त पटाची शासकीय शाळा आहे. तिच्यावर पालकांचा असलेला विश्वास हा गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक मोटे यांनी प्रास्ताविक केले. यानिमित्त महती मराठी भाषेची या हस्तलिखिताचेही अनावरण करण्यात आले. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या, स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्रद्धा गांगण, मंजिरी लिमये, रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन तर योगेश कदम यांनी अहवाल वाचन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

