पावस बसस्थानकातील शौचालयाची अखेर स्वच्छता
-rat१२p१२.jpg-
२५O१०१९७
पावस ः रत्नागिरी नगरपालिकेच्या गाडीने पावस बसस्थानकातील शौचालयाची साफसफाई करण्यात आली.
---
पावस बसस्थानकातील शौचालयाची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः पावस बसस्थानकामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या टाकीचे काम योग्य तऱ्हेने न झाल्यामुळे वारंवार भरते. त्यामुळे या शौचालयाला टाळे ठोकण्यात आले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर रत्नागिरी नगरपालिकेच्या गाडीने शौचालयाच्या टाकीची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे येथील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पावस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपये खर्च करून नव्याने शौचालयाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर ९९ लाख रुपये खर्च करून पावस बसस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले; परंतु त्या वेळी शौचालयाच्या टाकीचे बांधकाम योग्यप्रकारे न केल्याने त्यातील घाण, सांडपाणी बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे अखेर या शौचालयाला कुलूप लावण्यात आले होते; मात्र यामुळे प्रवाशांसह पावस बाजारपेठेत येणाऱ्या नागरिक, महिलांची गैरसोय होत होती. अखेर सहा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी रत्नागिरी पालिकेची गाडी मागवण्यात आली होती.

