वाहनामुळे वीज तारा तुटून रस्त्यावर

वाहनामुळे वीज तारा तुटून रस्त्यावर

Published on

10403

वाहनामुळे वीज तारा तुटून रस्त्यावर

मळेवाडमधील प्रकार; गंभीर अपघाताची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १३ ः मळेवाड जकातनाका येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणच्या संबंधित कार्यालयाने या घटनेची दखल घेण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मळेवाड जकातनाका येथील प्राथमिक शाळा क्र. १ जवळील विद्युतपुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने त्या रस्त्यावर पडल्या. या वाहिन्या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने तेथे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामस्थांनी लागलीच मळेवाड विद्युतपुरवठा उपकेंद्राकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र भ्रमणध्वनी बंद असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित विभागाशी संपर्क होत नसल्याने ग्रामस्थांनी विद्युत केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली. मात्र तेथील तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर तारा पडून दुचाकीस्वार जखमी झाला होता. मळेवाड वीज केंद्रातील मोबाईलही बरेच दिवस बंद आहे. एखादी दुर्घटना किंवा तक्रार करायची झाल्यास कोणाला संपर्क करणार, असा सवाल करत संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन पडलेल्या तारा बाजूला कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com