अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने जबाबदारी वाढली
अभिजात मराठीने वाढवली साहित्यिकांची जबाबदारी
सुनेत्रा जोशी ः रत्नागिरीत रंगले तालुकास्तरीय साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे लेखक, वाचक आणि रसिकांची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन सुनेत्रा जोशी यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्व. आमदार सौ. कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, हल्ली सर्वच लिखाणात नकारात्मकता वाढताना दिसते. यावर टिप्पणी करताना होकारात्मक लिखाणाची आवश्यकता सांगून साहित्य हे समाजमनाचा आरसा असते. साहित्य समाजसंधारणा, समाजाची बांधणी करत असते. त्यामुळे चांगले साहित्य, मालिका आणि चित्रपट येणे आवश्यक आहेत. समाजाची जडणघडण त्यातून होत असते. त्यामुळे लेखकाची जबाबदारी वाढते. ग्रंथालयामुळे आणि वाचनामुळे व्यक्ती, समाज विकसित होतो. त्यामुळे साहित्यिक ग्रंथालये आणि वाचक हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.
या प्रसंगी प्रा. सुनील जोपळे यांनी तालुकास्तरीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे औचित्य सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वाचन, वाचाल तर वाचाल या त्यांच्या उक्तीचे महत्त्व विषद केले. तर सागर पाटील यांनी शरीर सशक्त ठेवण्यासाठी आपण जसा व्यायाम करतो तसे वाचनातून आपले मन, विचार सशक्त प्रगल्भ होतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात वाचनाचे महत्त्व खूप आहे, असे सांगितले. या प्रसंगी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, उपाध्यक्ष संभाजी सावंत, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, संचालक विश्वनाथ बापट, विजय कालेकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, वसंत फडके, नीलाक्षी बांदिवडेकर, श्रीनिवास सरपोतदार, हरीश सामंत, संजीव लिमये, सुधाकर शिर्के, गुरूदेव नांदगावकर, रोशनी सावंत, कविता साबणे उपस्थित होते.
चौकट
कवीता, मुलाखतींनी रंगले संमेलन
या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात असे घडलो आम्ही, या परिसंवादात पत्रकार दुर्गेश आखाडे, कवी नाटककार, अमेय धोपटकर, साहित्यिक हरीश सामंत आणि कवी प्रकाश सावंत यांनी आपली जडणघडण आणि किस्से सांगून सत्र रंगतदार केले. तिसऱ्या सत्रात साहित्यिक ग्रंथालय आणि वाचन चळवळ या चर्चासत्रात नथुराम देवळेकर, दीपक नागवेकर, मनोज मुळ्ये आणि विनायक हातखांबकर यांनी आपले विचार मांडले. साहित्य संमेलनाच्या चौथ्या सत्रात कवी संमेलन झाले. त्यामध्ये कवी ज्ञानेश्वर पाटील, जयंत फडके, रिया लिंगायत, समृद्धी दामले, प्राजक्ता दामले, कुंदा बापट, ऋतुजा कुळकर्णी, वृषाली टाकळे, विशाखा पाटोळे, मुग्धा कुळये, नीलाक्षी बांदिवडेकर, श्रीनिवास सरपोतदार, संजय कुळये या कवींनी कविता सादर करून साहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात रंगत आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

