कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान नव्हे

कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान नव्हे

Published on

‘कायद्याचे पुस्तक
म्हणजे संविधान नव्हे’
गावतळे ः केवळ कायद्याचे पुस्तक म्हणजे संविधान नाही तर संविधान म्हणजे कोणत्याही गोष्टीची जी आपण आखणी करतो, नियोजन करतो, जबाबदाऱ्यांचे वाटप करतो त्या नियमांच्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित काही फलश्रुती प्राप्त होते, त्याचे सामाईक बंच म्हणजे संविधान. संविधानाचे अभ्यासक नुरखा पठाण यांनी दापोली येथील सभेत मार्गदर्शन करताना पटवून सांगितले. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका दापोली ग्रामीण यांच्यावतीने दापोली शहरातील पेन्शनर्स असोसिएशनच्या सभागृहात भारतीय संविधान जागृती अभियान व ओबीसी आरक्षण बचाव मोहीम अशा प्रकारचा जनहितासाठीचा महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला संविधानाचे गाढे अभ्यासक नुरखा पठाण यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी दापोली ग्रामीणचे अध्यक्ष गजानन पडियार, दापोली तालुका ओबीसी समाज संघटना अध्यक्ष माधव रामचंद्र उर्फ एम. आर. शेटये, प्रदीप कांबळे, महेंद्र जालगावकर, संदीप खामकर, अनंत करबेले, डॉ. सुनील गोरिवले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.


कुर्णे ग्रामपंचायतीत
वॉटरशेड महोत्सव
लांजा ः प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत लांजा क्लस्टर १ मधील कुर्णे ग्रामपंचायत येथे वॉटरशेड महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुर्णे येथे शालेय विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, नवीन वळण बंधारा, संयुक्त गॅबियन बंधारा भूमिपूजन, गेल्या वर्षी बांधण्यात आलेल्या वळण बंधारा त्यांचे लोकार्पण करण्यात आले. विजेत्यांना बक्षीस वितरण व शेतकरी बांधव यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी अभिजित शेलार यांनी पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व, जलसंवर्धनातील ग्रामस्थांचा सहभाग तसेच हिवरेबाजारच्या यशस्वी पाणलोट विकास मॉडेलचा संदर्भ देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांना प्रत्यक्ष उदाहरणे, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिकांद्वारे पाणलोट म्हणजे काय, त्याचे घटक कोणते आणि सर्वांच्या सहभागाने त्याची अंमलबजावणी कशी शक्य आहे या विषयी माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com