कुतुहल शक्ती नेहमी जागरूक ठेवावी

कुतुहल शक्ती नेहमी जागरूक ठेवावी

Published on

- rat१३p४.jpg-
२५O१०४१७
चिपळूण ः ५३व्या चिपळूण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे फीत कापून उद्‍घाटन करताना डॉ. श्रीपाद बाणावली, डॉ. नेताजी पाटील सोबत अन्य मान्यवर.
---
कुतूहल शक्ती जागरूक ठेवा
डॉ. श्रीपाद बाणावली ः ५३वे विज्ञान प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः बघण्यात आणि निरीक्षण करण्यात फार फरक आहे. निरीक्षण करताना विचार करणे फार महत्त्वाचे आहे. जो संशोधक आहे तो केवळ बघत नाही, तो निरीक्षण करतो. त्यामुळे त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन जागा होतो. यासाठी नेहमी आपली कुतूहलशक्ती जागरूक ठेवा, असे प्रतिपादन टाटा रुग्णालयाचे संशोधक डॉ. श्रीपाद बाणावली यांनी केले.
ते डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या प्रशालेत पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आणि जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्या विद्यमाने पार पडलेल्या पद्मभूषण डॉ. टी. रामसामी विज्ञाननगरीत ५३व्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, आपण शिक्षकांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. आपण मोबाईलमध्ये गढून न जाता आपली विचारप्रणाली प्रगल्भ करणे आवश्यक आहे. सतत वाचत राहा तरच आपण आपल्या पुढील जीवनात यशस्वी होऊ. या वेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, रुग्णालयाचे डॉ. नेताजी पाटील, संचालिका शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, मुख्याध्यापक प्रज्ञा पारकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com