राजापूरमधील विज्ञान प्रदर्शनात 90 प्रतिकृती
- rat१३p५.jpg ः
२५O१०४१८
राजापूर ः राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शनात विज्ञान प्रतिकृती विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना अमजद बोरकर. सोबत डावीकडून उत्तम भोसले, गुलजार ठाकूर, सुभाष सोकासने, सुनील पाटील, फकीर महंमद पावसकर, मलीक गडकरी, दिवाकर आडविरकर आदी.
---
साखरीनाटेत विज्ञान, नवोपक्रमांचा मेळा
प्रदर्शनात ९० प्रतिकृती ; प्राथमिक गटात पायल भेरे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ः जिल्हा परिषद, राजापूर पंचायत समिती, विज्ञान व गणित मंडळ राजापूर, नाटे-आंबोळगड केंद्र, मॉडर्न हायस्कूल साखरीनाटे, आयडीएल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ५३वे राजापूर तालुका विज्ञान प्रदर्शन साखरीनाटे येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेत झाले. विज्ञानदिंडी, विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रतिकृती स्पर्धा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन आदी विविध उपक्रम पार पडले. तालुक्यातील ९० प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांनी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतींनी या प्रदर्शनात विज्ञान अन् वैज्ञानिक संशोधनाचा जागर झाला.
‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावरील आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे साखरीनाटे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमजद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. तहसीलदार विकास गंबरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, साखरीनाटे सरपंच गुलजार ठाकूर, विज्ञान मंडळ जिल्हा कार्यवाह सुभाष सोकासने, विस्तार अधिकारी सुनील पाटील, फकीर पावसकर, मलीक गडकरी, दिवाकर आडविरकर आदी उपस्थित होते. प्राथमिक विद्यार्थी गट प्रतिकृती स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चुनाकोळवणच्या पायल भेरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा गुरव व तैसिम सिरवणकर (द्वितीय, कोंड्ये हायस्कूल), शर्विल भोसले व वेदांत पवार (तृतीय, गोखले कन्याशाळा) यांनी यश मिळवले. माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती स्पर्धेत नंदन बापट (प्रथम, शिवणेखुर्द हायस्कूल), सृष्टी कांबळे व श्रावणी सावंत (द्वितीय, कोंडये हायस्कूल), प्राची सुतार व नील जाधव (तृतीय, पाचल हायस्कूल) यांनी यश मिळवले. विविध गटातील निकाल पुढीलप्रमाणे (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) ः प्राथमिक स्तर (इ. ६वी-८वी) शैक्षणिक साहित्य निर्मिती गट ः सहदेव पालव (चुनाकोळवण शाळा नं. १), सुनील मदने (सरस्वती विद्यामंदिर, पाचल), विनायक साळुंखे (ताम्हाणे शाळा नं. २). माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्यनिर्मिती गट ः सत्यनारायण देसाई (पाचल हायस्कूल), आर. व्ही. जानकर (शिवणेखुर्द हायस्कूल), संतोष कदम (केळवली हायस्कूल). प्रयोगशाळा परिचर साहित्यनिर्मिती गट ः मंगेश पांचाळ (सरस्वती विद्यामंदिर, पाचल), प्रमोद यादव (नूतन विद्यामंदिर, ओणी). दिव्यांग प्राथमिक गट प्रतिकृती गट ः राज बाईत (चुनाकोळवण शाळा नं. १), यशोदीप घोसाळे (राजापूर हायस्कूल). दिव्यांग माध्यमिक गट प्रतिकृती ः उमेर सोलकर (मॉडर्न हायस्कूल, साखरीनाटे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

