पान एक-अडीच कोटींचे धऱण ३४ कोटींवर

पान एक-अडीच कोटींचे धऱण ३४ कोटींवर

Published on

टीपः swt1312.jpg मध्ये फोटो आहे.
10473
नीलेश राणे

अडीच कोटींचे धरण ३४ कोटींवर

राणेंनी फोडली वाचा; कोकणसाठीचे निकष बदला

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः ‘आंब्रड येथील धरणाची मूळ निविदा अडीच कोटींच्यादरम्यान होती. आज २९ वर्षांनंतर हा प्रकल्प ३४ कोटींवर जाऊनही पूर्ण झालेला नाही’, असे सांगत, कोकणातील एकूणच धरणांच्या कामामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला आमदार नीलेश राणे यांनी आज अधिवेशनात वाचा फोडली. कोकणातील धरणांबाबतचे निकष बदलण्याची मागणी त्यांनी केली.
तालुक्यातील आंब्रड सरमळे येथील गेली २९ वर्षे प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर आमदार राणे यांनी लक्ष वेधताना सांगितले की, ‘या धरणाला १९९६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामाची निविदा १९९८ मध्ये कोल्हापूर येथील ठेकेदाराला मिळाली. यावेळी याची निविदा किंमत २ कोटी ५४ लाख ८३ हजार ८५० एवढी होती आणि काम पूर्ण करायची मुदत २४ महिने होती, म्हणजे २००० मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर गेल्या २९ वर्षांत सातत्याने सुधारित मान्यता करून २ कोटींचा प्रकल्प आता ३४ कोटींवर गेला आहे. मूळ निविदा किमतीपेक्षा तब्बल ३२ कोटी रुपये वाढले; मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे. आतापर्यंत या योजनेवर साधारणतः १६ कोटी ४० लाख एवढा खर्च झाला असून, अजून १८ कोटी ५३ लाख एवढी रक्कम खर्च करायची शिल्लक आहे. ही शासनाची फसवणूक असून, यात ठेकेदार व तत्कालीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशाच प्रकारे मृद व जलसंधारण विभागात अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.’
................
चौकट
प्रकल्प सर्वेक्षणातही घोळ
या अपूर्ण प्रकल्पांसोबतच नवीन प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी होणाऱ्या विंधन विहीर खोदाई व इतर सर्वेक्षणात जाणीवपूर्वक ठराविक ठेकेदारांनाच काम देऊन काम न करताच बिल काढून चुकीचे अहवाल शासन स्तरावर पाठविले जात आहेत. यामुळे गरज व क्षमता असूनही सिंधुदुर्गात धरणांची कामे होताना दिसत नाहीत. या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई करावी, अशी मागणी आमदार राणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com