‘जलतरण’मध्ये ठाणे, नाशिकची बाजी

‘जलतरण’मध्ये ठाणे, नाशिकची बाजी

Published on

10476
मालवण ः राज्य संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करत स्पर्धेला सुरुवात केली.
10477
मालवण ः चिवला बीच येथे आयोजित १५व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील एक क्षण. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)

‘जलतरण’मध्ये ठाणे, नाशिकची बाजी

मालवणातील स्पर्धा; अश्विन, तनय, अनुजा, पी. वेण्याश्री वेगवान जलतरणपटू

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार, तनय लाड यांनी, तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगला, बेंगलोरच्या पी. वेण्याश्री यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. आजच्या पहिल्या दिवशी विविध गटांत सुमारे तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.

स्पर्धेचे उद्‍घाटन सकाळी राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर व जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले. यावेळी डॉ. तपन पानेगिरी, राष्ट्रपती ॲवॉर्ड राष्ट्रीय जलतरणपटू रूपाली रेपाळे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कृष्णा ढोलम, महेश कदम, राधिका परब, ज्योत्स्ना परब, डॉ. राहुल पंतवालावलकर, उद्योजक बंडू कांबळी, युसूफ चुडेसरा, सचिन शिंदे, किशोर पालकर, नील लब्दे, अरुण जगताप, समीर शिर्सेकर, डॉ. सचिन शिंदे, सुनील मयेकर, आदित्य डोयले, साहिल पालकर, इशिका पालकर, दीपाली डोईले, प्राची डोईले, राधिका पालकर, छाया डोईले, योगिता महाकाळ उपस्थित होते.

स्पर्धेचा उर्वरित निकाल असा
दोन किलोमीटर फिन्स मुले ः अनुक्रमे रणबीरसिंग गौर (नागपूर), आलोक जाधव (नाशिक), अथर्व भेडे (नागपूर), अक्षत सावंत (ठाणे), बाळकृष्ण येरम (मुंबई), स्मित सावला (नाशिक), सुहास काळे (नाशिक), श्रेयस पराडकर (रायगड), केतन कुलकर्णी (पुणे), आकाश कोटिया (गुजरात). दोन किलोमीटर फिन्स मुली-जान्हवी धामी (मुंबई), स्वराली वानखेडे (नाशिक), निधी बोरीकर (नागपूर), अरुंधती सोनाव (पुणे), समीक्षा वेरुळे (बीड), राजनंदिनी चाटे (बीड), राजेश्वरी गायकवाड (पुणे), शर्वरी हजारे (पुणे), पायल मोरे (नाशिक), वैदेही पोतदार (मुंबई). एक किलोमीटर फिन्स मुले-ध्रुव धामणे (नाशिक), रुद्र मोरे (मुंबई), अरहान खान (नागपूर), श्रीदत्त पुजारी (बेळगाव), श्रीनिक भामबेरे (पुणे), परम वाघ (नाशिक), हर्षद जाधव (नाशिक), विराज पोमन (नाशिक), शिवंश पाटील (नाशिक), अर्जुन वाबळे (नाशिक). एक किलोमीटर फिन्स मुली - अकिरा खोत (पालघर), वसुंधरा कसबे (नाशिक), मनस्वी सोनावणे (पुणे), साची बंदाबे (पुणे), प्राजक्ता सुर्वे (मुंबई), सायली घुग्रेतकर (बेळगाव), अद्या म्हात्रे (ठाणे), अनुभा सोरटे (नागपूर), संहिता करमरकर (सातारा), श्रावणी कुलकर्णी (पुणे).

१० किलोमीटर मुले अनुक्रमे
अश्विन कुमार (ठाणे), चैतन्य शिंदे (पुणे), वरद कुवर (नाशिक), रुद्र मानडे (कोल्हापूर), सागर कांबळे (पुणे), अनुज उगले (नाशिक), भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), पुष्कर शेळके (नाशिक), साईश मालवणकर (ठाणे), विश्वा शिंदीकर (नाशिक). १० किलोमीटर मुली अनुक्रमे- अनुजा उगले (नाशिक), मिहिका कोळंबेकर (मुंबई), स्वरा सावंत (ठाणे), चित्रानी नवले (सातारा), सुरभी शिंदे (मुंबई). १० किलोमीटर गट दुसरा मुले- तनय लाड (ठाणे), श्लोक कोकणे (ठाणे), अबीर मांडवकर (ठाणे), प्रतुल्य झगडे (ठाणे), अबीर साळसकर (ठाणे), आरव आहुजा (ठाणे), निर्भय भारती (ठाणे), देव रजपूत (नंदुरबार), मयांक म्हात्रे (रायगड), दर्श बिलोरिया (ठाणे). मुली अनुक्रमे-पी. वेण्याश्री (बेंगलोर), रेवा परब (ठाणे), हर्षदा चौधरी (ठाणे), गीतिशा भंडारे (ठाणे), प्रिशा वर्मा (ठाणे), अथश्री भोसले (ठाणे), विधी भोर (ठाणे), श्री शेट्टी (ठाणे), सई मुंडे (पुणे), स्पृहा उशीकर (ठाणे).

कनिष्ठ गटाचा निकाल असा
१ किलोमीटर मुली अनुक्रमे - आर्या हिरवे, समीप्ता वाव्हल, अस्मी चौधरी, मुलगे-रेयांश खामकर, राजवीर फरांदे, सिद्ध मुप्पीनेस्ती, मुली-विहा चौहान, साजिरी पाटील, मास्टर वो पुरुष-प्रदीप नासकर, आशीष रंजन, अक्षय पवार. २ किलोमीटर पुरुष-विरमनी मनोहरन, ज्ञानेश वानडे, खंतील दीक्षित, पुरुष-प्रसाद काजबजे, सुदेश पत्की. १ किलोमीटर पुरुष-शिरीष पत्की.
कनिष्ठ गट ः २ किलोमीटर मुली - मेधस्वी परात्ने, मुलगे-उदित मलिक, लेना प्रनेश. मुलगे-रणबीरसिंग गौर, ध्रुव धामणे, नील पत्की. मुली-ओवी पवार, मुलगे-सुयश हिंदळेकर, सूर्या मंडल, त्रिग्या मुन. मुली-अस्मी हिरवे, शफझा शाहिद, ऐशी चक्रवर्ती. १ किलोमीटर मुलगे-बाळकृष्ण येरम, आरव भारद्वाज, शिवंश पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com