केशवसुतांच्या साहित्यनगरीत विचारांचा मेळा

केशवसुतांच्या साहित्यनगरीत विचारांचा मेळा

Published on

10487
सावंतवाडी ः येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना प्रा. प्रवीण बांदेकर. बाजूला रमेश बोंद्रे, गणेश बोर्डेकर.


केशवसुतांच्या साहित्यनगरीत विचारांचा मेळा

प्रवीण बांदेकर ः सावंतवाडीत २७ पासून जिल्हास्तरीय साहित्य संमेलन


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडीतर्फे आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन २७ व २८ डिसेंबरला कविवर्य केशवसुत साहित्यनगरी, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित केले आहे, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रा. बांदेकर म्हणाले, ‘मराठी भाषा विभाग व साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून पहिल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अलक्षित साहित्यिक व लोककला यांच्यावर मान्यवर व अभ्यासकांकडून मौलिक विचारमंथन यातून घडणार आहे. २७ ला सायंकाळी चार वाजता ग्रंथदिंडी, तर २८ ला सकाळी साडेनऊला कविवर्य केशवसुत साहित्यनगरीत उद्‍घाटन समारंभ होणार आहे. उद्‍घाटक म्हणून डॉ. सुशीलकुमार लवटे, संमेलनाध्यक्ष नीरजा असणार आहेत. विशेष उपस्थिती डॉ. दासू वैद्य, प्रकाश होळकर, प्रा. श्रीधर नांदेडकर, संपदा कुलकर्णी यांची असेल. शिक्षणाधिकारी गणपत कळमकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, भरत गावडे, विठ्ठल कदम, शेखर सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी, वामन पंडित, म. ल. देसाई उपस्थित राहणार आहेत.’
याचवेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व युवा मान्यवरांचा सत्कार तसेच संमेलनपूर्व विविध स्पर्धांतील विजेत्यांचा पारितोषिक प्रदान समारंभ होणार आहे. यात विठ्ठल गावकर, ना. शि. परब, आबा रणसिंग, गणपत परब, विजयालक्ष्मी भोसले, डॉ. अशोक सुर्वे, संजीवनी देसाई, प्रभाकर भागवत, बबन परब, आनंद देवळी, अनिल हळदिवे, प्रसाद गावडे, रवी जाधव, प्रमोद दळवी, अक्षय सावंत, मेगल डिसोझा, पूजा गवस यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात अभिनेत्री डॉ. संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांची विशेष मुलाखत डॉ. सुमेधा नाईक-धुरी, प्रा. अमर प्रभू घेणार असून, दुसऱ्या सत्रात सिंधुदुर्गातील ‘अलक्षित साहित्यिक’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. एन. डी. कार्वेकर, प्रा. वैभव साटम प्रमुख वक्ते असणार असून अध्यक्षस्थानी डॉ. बाळकृष्ण लळीत राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात विविध साहित्य प्रवाहांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे योगदान यावर परिसंवाद होणार आहे. यात डॉ. शरयू आसोलकर, अंकुश कदम, डॉ. सई लळीत, कल्पना मलये वक्ते तर अध्यक्षस्थानी उषा परब असणार आहेत.
--
चौथ्या सत्रात कविसंवाद
चौथ्या सत्रात कविसंवाद होणार असून दासू वैद्य, प्रकाश होळकर, श्रीधर नांदेडकर, अजय कांडर यांचा सहभाग असणार आहे. तसेच विस्मरणातील कविता दादा मडकईकर, वामन पंडित, सरिता पवार, प्रा. केदार म्हसकर, विजय ठाकर सादर करणार असून अध्यक्षस्थानी मोहन कुंभार राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजता सिंधुदुर्गातील लोककलांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती प्रा. बांदेकर यांनी दिली‌. यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे, सहकार्यवाह गणेश बोर्डेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com