''आयएनएस विक्रांत''ची प्रतिकृती रत्नागिरीत
rat१३p१८.jpg -
P२५O१०४८५
रत्नागिरी ः ‘आयएनएस विक्रांत’ जहाजाचे मॉडेलसह शिप मॉडेलर मयूर वाडकर व त्याच्या सहकारी.
‘आयएनएस विक्रांत’ची प्रतिकृती रत्नागिरीत
शिप मॉडेलर मयूर वाडकरची मेहनत; कोलकात्ता म्युझियममध्ये ठेवणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रत्नागिरीतील शिप मॉडेलर मयूर उमेश वाडकर आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी मिळून देशातील पहिले ३५ फूट लांबीचे ‘आयएनएस विक्रांत’ (ओल्ड) प्रतिकृती केवळ २२ दिवसांत पूर्ण केली. ही प्रतिकृती ‘कॅटेगरी क्लास’ मधील असून, संपूर्ण भारतात अशा प्रकारची प्रतिकृती रत्नागिरीत प्रथमच तयार करण्यात आली आहे. कोलकाता येथे तयार होत असलेल्या शिपयार्ड म्युझियमसाठी मागणी होती. ही प्रतिकृती लवकरच कोलकाता शिपयार्ड येथे तयार होत असलेल्या म्युझियमसाठी नेण्यात येणार आहे.
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-पाटीलवाडी येथे महिनाभरापासून या जहाजाची प्रतिकृती तयार केली जात होती. मयूर वाडकर हे २०१७ पासून शिप मॉडेलिंगमध्ये कार्यरत आहेत. एनसीसीमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते या क्षेत्रातच रमले. यापूर्वी त्यांनी आयएनएस कुकरी, आयएनएस विक्रांत, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस की, आयएनएस कोलकातासारखी जहाजांची मॉडेल बनवली आहेत. मयूर वाडकर यांनी आपले सहकारी नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, दानियल सारंग, निहारिका राउत, फहद लाला, अर्ष फणसोपकर, निखिल गावकर, संपदा हर्डीकर यांसह एकूण १४ जणांच्या मदतीने हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. सुमारे सात ते आठ लाख रुपये त्यासाठी त्याने खर्च केले.
मयूर वाडकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २२ दिवसांत या जहाजाची प्रतिकृती पूर्ण केली. लवकरच ती प्रतिकृती कोलकाता शिपयार्ड म्युझियममध्ये ठेवली जाणार आहे.
----
कोट
शिप मॉडेलिंगमध्ये करिअरच्यादृष्टीने मोठा स्कोप आहे. या कलेतील तरुणांनी योग्य मार्गदर्शनाअभावी न थांबता स्वतःला या दिशेने संधी द्यावी.
- मयूर वाडकर, शिप मॉडेलर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

