असनियेत वीजवाहिन्यांचे काम अपूर्ण
10590
अपूर्ण वीज वाहिनीमुळे संताप
असनियेत बागायतीचे नुकसान; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः असनिये गावातील जीर्ण वीज वाहिन्या व विद्युत खांब बदलण्यासाठी ग्रामस्थांनी २२ जुलैला केलेल्या आंदोलनानंतर ५० वीजवाहिनी गाळे बसवणे व सर्व जुने, जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे आश्वासन महावितरणने दिले होते; मात्र अद्यापही काम अर्धवट स्थितीत असून शेतीपंप बंद असल्याने बागायती करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तत्काळ काम पूर्ण करून बागांना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच रेश्मा सावंत व ग्रामस्थ संदीप सावंत यांनी दिला आहे.
अपूर्ण कामामुळे बागांना पाणी देता येत नसल्याने परिणामी यावर्षी नव्याने लावलेली झाडे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. महावितरणच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त करत पुन्हा एकदा स्थानिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येथील काम शून्य गतीने सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
सरपंच सावंत यांनी सांगितले की, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व बांदा शाखा अभियंता हे सर्व अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पालकमंत्री व मंत्रालयात वीजमंत्र्यांची तातडीची भेट घेऊन थेट कारवाईची मागणीही करण्यात येणार आहे. दरम्यान, वीज वाहिन्या व खांबांचे काम तत्काळ पूर्ण करून बागांना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रशासनाने आश्वासनांऐवजी तत्काळ कृती करावी, अशी ठाम मागणी स्थानिकांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

