कट्टा येथे गुरुवारी आरोग्य चिकित्सा
कट्टा येथे गुरुवारी
आरोग्य चिकित्सा
मालवण : जिल्हा आरोग्य विभाग, एनसीडी सेल सिंधुदुर्ग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, गोळवण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १८) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वराडकर हायस्कूल कट्टा येथे भव्य आरोग्य व कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि उपचारांसाठी उपलब्ध असतील. यात कर्करोग तपासणी व्हॅन, ऑर्थोपेडिक सर्जन तसेच हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, दंतरोग, नेत्ररोगतज्ज्ञ, जनरल सर्जन, आहारतज्ज्ञ यांच्याद्वारे तपासणी केली जाईल. या शिबिरासाठी एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालय, कुडाळ वराडकर महाविद्यालय, कट्टा यांचे सहकार्य लाभणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
..................
माळगाव रवळनाथ
जत्रोत्सव उद्यापासून
मसुरे ः माळगाव श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव १६ ते १८ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. मंगळवारी (ता. १६) श्री देव रवळनाथ मंदिरात ओट्या भरणे, गाऱ्हाणे, नवस बोलणे व फेडणे, रात्री देव तरंगासह सवाद्य पालखी मिरवणूक, त्यानंतर पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवारी (ता. १७) श्री देव रवळनाथ पंचायतन देवतरंगांसह बागायत येथील ब्राह्मणदेवाच्या भेटीला येणार असून ब्राह्मण देवालय येथे वस्तिस्थानी राहणार आहेत. गुरुवारी (ता. १८) बागायत ब्राह्मण देवालय येथे दुपारी महाप्रसाद तसेच सायंकाळी ओट्या भरणे आदी कार्यक्रमानंतर श्री देव रवळनाथ पंचायतन, माळगाव येथील मंदिरात गेल्यावर तीन दिवसांच्या वार्षिक जत्रोत्सवाची विधीवत सांगता होणार आहे. भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माळगाव ग्रामस्थांच्यावतीने देवस्थान प्रमुख बबन सरनाईक यांनी केले आहे.
......................
सरंबळ येथे उद्या
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः सरंबळ-कदमवाडी येथील श्री देवी सातेरी मांड देवस्थान येथे मंगळवारी (ता. १६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी सातला कदमवाडी ग्रामस्थांचे भजन, रात्री आठला जय हनुमान दशावतार मंडळ, आरोस-दांडेली यांचे नाटक होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
.........................
उभादांडा घुमटेश्वराचा
उद्या वर्धापन दिन
वेंगुर्ले ः उभादांडा-नवाबाग येथील श्री देव घुमटेश्वरचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (ता. १६) विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यानिमित्त सकाळी श्री ब्राह्मण देवता अभिषेक, यजमान देहशुद्धी, प्रायश्चित विधी, गणेश पूजा, देवता पूजा, लघुरुद्र, अभिषेक, महापूजा, नैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी साडेपाचला विठ्ठलरखुमाई मंडळाचा हरिपाठ, साडेसहाला महाआरती, सातला प्रासादिक मंडळ, स्वरसंगीत हरिचरणगिरी यांचे भजन, रात्री आठला स्वरबंदिश प्रासादिक मंडळाचे भजन, नऊला सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘कानडा विठ्ठल कर्नाटकू’ हा मिनी ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
........................
कणकवलीत २८ ला
‘संस्कृत’ कार्यशाळा
कणकवली ः कणकवली नगरवाचनालयातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळा २८ डिसेंबरला सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात आयोजित केली आहे. पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती पवार या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. संस्कृतच्या अभ्यासक्रमावर ही कार्यशाळा आधारित आहे. सभागृहाची आसन मर्यादा २०० एवढीच आहे. त्यामुळे २०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. नोंदणीसाठी विद्यार्थी व पालकांनी ग्रंथपाल राजन ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष आमदार नीतेश राणे व कार्यवाह महंमद पीरखान यांनी केले आहे.
-----
मालोंड परबवाडीत
बुधवारी जत्रोत्सव
मसुरे ः मालोंड बेलाचीवाडी परबवाडी येथील श्री देवी पावणाई रवळनाथ जत्रोत्सव बुधवारी (ता. १७) विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात ओट्या भरणे, रात्री देवतरंगांसह पालखी मिरवणूक व पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
..........................
वेरली देवी सातेरीचा
गुरुवारी वार्षिकोत्सव
मालवण ः तालुक्यातील वेरली येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी (ता. १८) विविध कार्यक्रमांनी होणार आहे. यानिमित्त मंदिरात ओट्या भरणे, गाऱ्हाणे तसेच रात्री चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

