भंडारी समाजाची नवी कार्यकारीणी
10632
भंडारी समाजाची नवी कार्यकारीणी
तळेरे ः विक्रोळी (मुंबई) कन्नमवार नगर येथील विकास महाविद्यालयात समविचारी भंडारी बांधवांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन माध्यमातून समन्वय साधत व एकत्र येत भंडारी फेडरेशन (नियोजित) च्या नव्या कार्यकारिणी निवडणूकीत सहभाग घेतला. यावेळी २०२६-२०२८ साठी नवी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. कार्यकारीणी अशी ः अॅड. संजय तेंडुलकर (अध्यक्ष), सुरेश भंडारी (उपाध्यक्ष), गणेश राऊळ (सचिव), कृष्णा कांबळी (उपसचिव), दिनकर नांदोसकर (खजिनदार). व्यक्तिशः व ऑनलाइन माध्यमातून भंडारी बांधवांनी निवडणूक प्रक्रियेत मतदान केले. भविष्यात भंडारी समाजाला सर्वतोपरी विकासात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असण्याची तयारी उपस्थितांनी दर्शवली.
--------------
10633
चिंदर ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य केंद्रास शवपेटी
आचरा ः चिंदर गावासाठी शवपेटीची गरज ओळखून चिंदर ग्रामपंचायत १५व्या वित्त आयोगातून (ग्रामस्तर) खरेदी केलेल्या शवपेटीचे सरपंच नम्रता महांकाळ-पालकर, उपसरपंच महेंद्र मांजरेकर, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते डॉ. विवेक घाडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. हा कार्यक्रम चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक सुर्वे, शशिकांत नाटेकर, जान्हवी घाडी, संतोष गांवकर, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, रविंद्र घागरे, दिंगबर जाधव, सागर अपराज, हिमाली अमरे, प्रिया पालकर, दामिनी पाताडे, अंकिता घाडी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, मंगेश नाटेकर, विश्राम माळगांवकर, रणजित दत्तदास, रोहित पाटील, समिर अपराज, तुषार पवार, रोशनी फर्नांडिस, सुरेश साटम, अजित साटम आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उपसरपंच महेंद्र मांजरेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

