ओरोस ‘उपप्रादेशिक’ कार्यालयास
‘ह्यूमन राईट’ शिष्टमंडळाची भेट

ओरोस ‘उपप्रादेशिक’ कार्यालयास ‘ह्यूमन राईट’ शिष्टमंडळाची भेट

Published on

10641

ओरोस ‘उपप्रादेशिक’ कार्यालयास
‘ह्यूमन राईट’ शिष्टमंडळाची भेट

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची ओरोस येथील मोटर वाहन परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वाहतुकीविषयीच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्रलंबित प्रश्न व मागण्या मार्गी लावण्यासाठी आग्रही भूमिका मांडली.
यामध्ये प्रामुख्याने ओरोस जैतापकर कॉलनीसमोरील उड्डाण पुलावर सुरू केलेला बस थांबा सुरक्षित जागी हलवावा, सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, जिल्ह्यातील रिक्षा चालकांना पासिंगसाठी प्रथम प्राधान्य द्यावे, रिक्षाचालकांना ड्रेसकोड अनिवार्य करावा, दुचाकी भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करावी, कागदपत्रांना लागणाऱ्या शुल्काचा फलक कार्यालयांमध्ये लावावा, महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सीला रिक्षाला किट लावण्याचा दिलेला परवाना रद्द करावा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा खजिनदार हनिफ पिरखान, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख संजय खानविलकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही श्री. काळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com