रेणुका प्रतिष्ठानचा वर्धापनदिन साजरा
rat१४p११.jpg-
P२५O१०५७०
रत्नागिरी : रेणुका प्रतिष्ठानचा वर्धापनदिन आणि संत नामदेव महाराजांच्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संजय पतंगे. सोबत दीपा पाटकर व मान्यवर.
---
रेणुका प्रतिष्ठानचा वर्धापनदिन
विविध कार्यक्रमांनी साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : रेणुका प्रतिष्ठानच्या स्थापना दिवसानिमित्त आणि संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या निर्वाण वर्षानिमित्त राष्ट्रसेविका समितीतर्फे संत नामदेवांचे अभंग गायन व चरित्र कथन कार्यक्रम सन्मित्रनगर येथील पित्रे वसतिगृहात झाला.
मुख्य वक्ते व सामाजिक कार्यकर्ते व संत नामदेव साहित्याचे अभ्यासक संजय पतंगे आणि रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्ष दीपा पाटकर, सचिव मानसी डिंगणकर यांनी भारतमाता व रेणूका माता, संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रिया केळकर यांनी विष्णुमय जग श्लोक सादर केला. प्रतिष्ठानच्या सचिव अॅड. मानसी डिंगणकर यांनी प्रास्ताविक केले. वक्ते संजय पतंगे यांनी नामदेव महाराजांचे चरित्र, साहित्य, अभंग रचना, भागवत धर्म प्रचार, विविध भाषांतील अभंग रचना, गुरू ग्रंथ साहेबमध्ये समावेश याबाबत माहिती दिली. भारतात अनेक राज्यांत संत शिरोमणी नामदेव महाराजांचे शिष्य, मंदिरे या बद्दल सविस्तर माहिती दिली.
माधवी फडके यांनी आधी रचिली, कांचन जोशी यांनी नामाचा बाजार पंढरी हे अभंग सादर केले. तसेच श्वेता जोगळेकर परब्रम्ह निष्काम अभंग सादर केला. अनुराधा चांदोरकर, मनीषा शारंगधर, वसुंधरा पटवर्धन यांनी अभंग सादर केले. उमा दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. दक्षिण रत्नागिरी सेवा प्रमुख डॉ. रंजना केतकर यांनी समारोप केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

