रत्नागिरी- गुलाबी थंडीत रत्नागिरी ते पावस पायी पदयात्रा

रत्नागिरी- गुलाबी थंडीत रत्नागिरी ते पावस पायी पदयात्रा

Published on

rat14p13.jpg-
O10572
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त पदयात्रेत सहभागी स्वामीभक्त.
-rat14p14.jpg-
10573
पावस : स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराबाहेर फेर धरून रिंगणात नाचताना भाविक.

हरीनामाच्या गजरात रत्नागिरी ते पावस पायी पदयात्रा
स्वामी स्वरुपानंद जन्मोत्सवानिमित्त आयोजन; शेकडो स्वामीभक्तांचा सहभाग
रत्नागिरी, ता. १४ : स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त रविवारी सकाळी भरपूर थंडीच्या वातावरणात ॐ राम कृष्ण हरी, हरीपाठाचा गजर झाला. रत्नागिरी ते पावस या वीस किमीच्या मार्गावर शेकडो वारकऱ्यांची पायी पदयात्रा उत्साहात झाली. यंदा पदयात्रेचे २३ वे वर्ष होते.
जयस्तंभ येथून पहाटे ४.३० वाजता पदयात्रेला सुरवात झाली. दरवर्षीप्रमाणे शेकडो स्वामीभक्त यात सामील झाले. पांढरा झब्बा लेंगा, पांढरी टोपी घातलेले पुरुष, आणि पांढऱ्या साडी परिधान करून आलेल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पहाटेच्या धुंद वातावरणात ॐ राम कृष्ण हरि नामस्मरण करीत आणि ज्ञानदेवांचा हरिपाठ गात स्वामीभक्त मार्गस्थ झाले. स्वामीभक्त अनंत आगाशे व सहकाऱ्यांनी ही दिंडी सुरू केली व ती अव्याहतपणे सुरू आहे. श्री स्वामी स्वरूपानंद सांगतात नाम घ्या तेच अखेरच्या श्‍वासापर्यंत तुम्हाला साथ देईल. नामात सर्वकाही आहे. त्यामुळे आजची पदयात्रा समाधान देणारी होती, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
पारा घसरल्याने गेले आठ दिवस थंडी भरपूर प्रमाणात पडत आहे. तरीही आज पदयात्रेला शेकडो वारकऱ्यांची गर्दी झाली. सकाळचे धुके, भाट्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी अशा वातावरणात सुमधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी हळुहळू पुढे चालत होते. वारीमध्ये कोहिनूर हॉटेलनजीक व फणसोप हायस्कूल आणि रनपार पूल या तीन ठिकाणी विसावा घेण्यात आला. त्यानंतर वारी पावस येथे पोहोचली आणि मंदिरासमोर फेर धरून वारकऱ्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा गजर केला. अनेकांनी अभंग सादरीकरण केले. त्यानंतर स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाकडून अल्पोपहाराची व्यवस्था केली. त्याचा आस्वाद घेऊन वारकरी पुन्हा रत्नागिरीत पोहोचले.

कोट
मी गेल्या १० वर्षांपासून या पदयात्रेत चालतो आहे. स्वामी स्वरूपानंदांचे नाम घेत आणि पायी चालत चालत जाण्याचा अनुभव फारच समाधान व नवी उर्जा देणारा आहे. रत्नागिरी शहरातील व्यापारी व नोकरदार वर्ग या दिंडीत सामील होतात. स्वामी नाम घेऊन आनंद मिळतो. दरवर्षी स्वामी जन्मोत्सवाच्या अगोदरच्या रविवारी दिंडी निघते. अनंत आगाशे व सहकाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि वेळेचे काटेकोर नियोजन असते.
- प्रवीण मादुस्कर, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com