रिपेरियन राइट नुसार पाणी कोकणालाच मिळावे

रिपेरियन राइट नुसार पाणी कोकणालाच मिळावे

Published on

रिपेरियन राइट नुसार
पाणी कोकणालाच मिळावे
ॲड. विलास पाटणे ; कोयनेचे पाणी मराठवाड्यात नेण्याची पुन्हा चर्चा
रत्नागिरी, ता. १४ ः ज्या प्रदेशातून पाणी वाहते, त्या प्रदेशातील जनतेचा पाण्यावरचा समान हक्क अर्थात ‘रिपेरियन राइट’ प्राधान्याने मान्य केला पाहिजे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कितीही गंभीर असला तरी कोकणचे पाणी कोकणालाच मिळाले पाहिजे, असा विचार ॲड. विलास पाटणे यांनी मांडला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना पुन्हा एकदा कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या शक्यतेची घोषणा केली आहे. यापूर्वी कोयना धरणातील पाणी वीजनिर्मितीनंतर मुंबईकडे वळवण्याचा एक नवीन प्रस्ताव चर्चेत आला होता. त्यात मुख्यमंत्र्यांच्या ताज्या घोषणेमुळे ''कोकणचे पाणी कोकणालाच मिळावे'' या मागणीने जोर धरला आहे. कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर सुमारे ६८ टीएमसी (TMC) पाणी चिपळूणमधील वशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाते. हे वाहून जाणारे पाणी २९० किलोमीटर अंतरावरील मुंबई शहराला जलवाहिन्यांद्वारे पुरवण्याचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी व्हॅस कॉम कंपनीने नुकतेच हवाई सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्यासाठी तब्बल ३८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या योजनेनुसार, कोयना धरणातून बाहेर पडणाऱ्या ६८ टीएमसी पाण्यापैकी १८ टीएमसी पाणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला पिण्यासाठी व शेतीसाठी दिले जाईल, तर उर्वरित ५० टीएमसी पाणी पाईपलाईनद्वारे मुंबईकडे वळवले जाईल.
दुर्दैवाची बाब म्हणजे, १५० इंच पाऊस पडणाऱ्या कोकणात पावसाळ्यात महापुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी होते, तर दुसरीकडे उन्हाळ्यात याच कोकणातील महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता डोक्यावर हंडा घेऊन मैलोन्-मैल पायपीट करावी लागते. हे दुष्टचक्र तातडीने तोडणे आवश्यक आहे. या समस्येवर उपाय म्हणून, कोकणात नद्यांमधील गाळ काढणे यासारखे पूरप्रतिबंधक उपाय योजून स्थानिक जलसंवर्धनावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे मत ॲड. पाटणे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com