-बियाण्यातील इतिहास, कलेतील भविष्य
जपूया बीजवारसा... लोगो
(२ डिसेंबर टुडे ३)
बियाण्यातील इतिहास,
कलेतील भविष्य
हरितक्रांतीमुळे भारतात अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली आणि अन्नसुरक्षा मजबूत झाली; परंतु त्याचे काही नकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे पारंपरिक बियाणे आणि त्यांच्या विविध जाती हळूहळू कमी होत गेल्या आणि आदिम बियाणापासून आपली नाळ तुटली; पण हवामान बदलामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा आदिम स्थानिक बियाणाकडे वळत आहे. या बियाण्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कलेचा उपयोग झाला पाहिजे...!
- rat१५p५.jpg-
25O10760
- कुणाल अणेराव,
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी,
सृष्टिज्ञान संस्था
-----
बीज म्हणजे स्वप्नांच्या मातीतील ठिणगी,
कलेने त्याला शब्द दिले, रंग दिले.
शेतातून शहराकडे प्रवास त्याचा,
गाणी, चित्रं, कथा बनून आला.
मनात रूजला की, विचार फुलतात
नव्या भविष्यात आशा उगवतात
बीज जपण्याचे कला सामर्थ्य देईल
जीवन जपण्याचे बळ आपल्यात देईल
बियाणे हे मानवाच्या उत्क्रांतीतील सर्वात महत्त्वाचे शोधांपैकी एक आहे. आदिमानवाने जेव्हा बियाणे पेरले आणि त्यातून अन्न निर्माण झाले, त्यातून सभ्यता आणि संस्कृतीची सुरुवात झाली. हाच छोटासा बीज इतिहासाच्या गर्भात प्रचंड सामर्थ्य बाळगून आहे. काळाच्या ओघात शेती, विज्ञान आणि मानवाची प्रगती याचा आधार बनलेले बियाणे आज नव्या रूपात कलेतही उमलत आहे व नव्या रूपात लोकांसमोर येत आहे. बियाण्याच्या आकारात, रंगात आणि संरचनेत निसर्गाची अप्रतिम कलाकुसर दडलेली आहे. कलाकार त्या सौंदर्याचा शोध घेत विविध माध्यमांतून बियाण्यातील जीवनशक्ती आणि भविष्याची शक्यता व्यक्त करत आहेत. म्हणूनच, बियाणे हे फक्त शेतीचे साधन नसून, इतिहासातून उगवलेल्या कलेच्या नव्या क्षितिजांचे बीज आहे, जे आपल्याला भविष्यातील सर्जनशीलता आणि समृद्धीकडे घेऊन जाते.
मधल्या काळात हरितक्रांतीमुळे भारतात अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ झाली आणि अन्नसुरक्षा मजबूत झाली; परंतु त्याचे काही नकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. विशेषतः स्थानिक किंवा indigenous (मूळ) बियाण्यांवर. हरितक्रांतीत उच्च उत्पादन देणाऱ्या HYV बियाण्यांचा प्रसार झाला आणि रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे पारंपरिक बियाणे आणि त्यांच्या विविध जाती हळूहळू कमी होत गेल्या व आदिम बियाणापासून आपली नाळ तुटली; पण हवामान बदलामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा कल पुन्हा आदिम स्थानिक बियाणाकडे वळवला आहे. म्हणून बियाण्यांचे महत्त्व लोकांपर्यंत कलेच्या माध्यमातून पोहोचवण्याची नितांत गरज होती. त्यासाठी काही कलाकार एकत्र येऊन यावरती काम करत आहेत. हे करण्याची महत्त्वाची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. त्याप्रमाणे अपेक्षित परिमाण साधले जाईल, असा विश्वासही आहे.
- महत्त्वाची कारणे
समजण्यास सोपे होते ः शेती, निसर्ग, बीजसंवर्धनसारख्या विषयांवर थेट माहिती दिली तर ती कधीकधी कठीण वाटू शकते; पण चित्रकला, नाटक, संगीत, कथा किंवा सिनेमा यांतून सांगितले तर लोकांना ते सहज समजते आणि मनात कायम राहते.
भावनिक नातं निर्माण होतं ः बीज फक्त शेतीचं साधन नाही ते जीवनाचा, संस्कृतीचा आणि सातत्याचा आधार आहे. कलेतून जेव्हा बिजाचं चित्रण होतं तेव्हा लोक भावनिकपण जोडले जातात आणि त्याची जपणूक करण्याची इच्छा वाढते.
परंपरा आणि संस्कृती जपल्या जातात ः भारतात अनेक पारंपरिक पिकं, स्थानिक बिया आणि कृषिज्ञान हरवत चाललं आहे. कलेतून या परंपरा लोकांपर्यंत पोहोचल्यातर त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकू शकतात.
समाजजागृती आणि प्रेरणा मिळते ः कला लोकांना विचार करायला लावते, नवे प्रश्न उपस्थित करते आणि कृतीसाठी प्रेरित करते. जसे की, स्थानिक बियाणांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण व शेतकऱ्यांचे हक्क.
सर्वांना सहभागी होण्याची संधी शेती आणि आदिम बियाणांचा विषय फक्त शेतकऱ्यांसाठी नाही. कला शहरात राहणाऱ्या लोकांनाही त्या प्रवासात सहभागी करते.
- कलेच्या माध्यमातून आदिम बियाणांच्या प्रवास मांडणाऱ्या संस्था :
बीजकथा (Seed Stories) : बीजकथा हा उपक्रम आदिम बियाणांतील आव्हाने, त्यांचे विविध सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व समजून सांगण्याकरिता तज्ज्ञ, बियाणे संवर्धक आणि कलाकार एकत्र येऊन नव्याने मांडत आहेत.
स्थानिक लँड आर्ट आणि बीजप्रयोग - पेरणी किंवा बीज आणि पारिस्थितीक विषयांवर पारंपरिक आणि प्रयोगधर्म काम करणारे ग्रुप, अभियान, त्यांच्या पोस्टर्स किंवा रिल्समध्ये ग्रामीण भागांतून नॅचरल-डायिंग, बीजजतन आणि परफॉर्मन्स आर्ट समाविष्ट आढळतात.
ग्रामीण सार्वजनिक कला व वॉलपेंटिंग प्रकल्प ः गावांच्या वारसा, शेती भित्तिचित्रे आणि सार्वजनिक स्थापत्यांमार्फत कला पोहोचवण्याचे राज्य व राष्ट्रीय पटलावरील उपक्रम.
जसा बियाणे इतिहास सांगते तशी कला भविष्य घडवते. कलाकाराची कल्पना हा उद्याचा नकाशा असतो. चित्रकला, कविता, संगीत किंवा डिजिटल आर्ट मानवाला नव्या शक्यता दाखवते. भविष्याचे समाजरचना, मानवतावादी मूल्ये, वैज्ञानिक दृष्टी हे सर्व कलाकृतीत रूजतात. कला प्रयोगशाळेसारखीच आहे जिथे मानव भविष्याशी संवाद साधतो. कल्पनाशक्तीतून उदयास येणाऱ्या प्रतिमा, सौंदर्यदृष्टी, नवी भाषा हे सर्व भविष्यातील मानसिकता आणि संस्कृती घडवतात. म्हणूनच कला हे ‘दृष्टीचे बियाणे’ आहे; पण ते भविष्याकडे उलगडते.
आदिम बियाणे म्हणजे जीवनाची मूळ गुरूकिल्ली
आणि आदिम कला म्हणजे त्या जीवनाचा उत्सवच !
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

