नृत्य-नाट्य, वेशभूषा, क्रीडा स्पर्धांनी रंगत

नृत्य-नाट्य, वेशभूषा, क्रीडा स्पर्धांनी रंगत

Published on

swt152.jpg
10776
कुडाळः संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उद्योजक प्रमोद भोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)

नृत्य-नाट्य, वेशभूषा, क्रीडा स्पर्धांनी रंगत
कुडाळातील स्नेहसंमेलनः संत राऊळ महाविद्यालयात रंगला सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः महाविद्यालयीन जीवनातील काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण म्हणजे स्नेहसंमेलन. संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनामुळे या अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार ठरले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ‘आयर्नमॅन’ किताब प्राप्त माजी विद्यार्थी, उद्योजक प्रमोद भोगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराजांना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून झाले. उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले.
उपकार्याध्यक्ष शिरसाट यांच्या हस्ते श्री. भोगटे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री. भोगटे यांनी, हा बहुमान दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.
मौजमजा मर्यादा राखून करा. आमचे विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रातील कलाकार नाहीत, हे ध्यानात ठेवून त्यांना प्रोत्साहन देत कार्यक्रमांचा आस्वाद घ्या, असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांना एका विशेष एकपात्री प्रयोगातून अभिवादन करण्यात आले. दिवंगत नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांना एकपात्री प्रयोगातून आदरांजली अर्पण करण्यात आली. माजी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी ‘शोधीसी मानवा’ हे गीत सादर केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी गौरव गीत, मराठी-हिंदी गीतांवर विविध नृत्ये, शास्त्रीय मृदंग वादन, बासरी वादन व इतर कार्यक्रम सादर केले. याआधी आठवडाभर वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या. पारंपरिक वेशभूषा दिन, फनफेअर, फनी गेम्सचा विद्यार्थांनी आनंद घेतला. प्रा. सुरवसे यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
उपस्थित विद्यार्थ्यांनीही सर्व कलाकार विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद दिली. गुणदर्शन कार्यक्रमाचे निवेदन साईवेद मालवणकर, सुचिता मांजरेकर, गायत्री गावकर यांनी केले. प्रा. डॉ. आर. वाय. ठाकूर यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन केले. संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, सर्व पदाधिकारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मंगेश जांबळे, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य प्राध्यापक, विविध समितीचे समन्वयक, इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मराठा हॉल येथे झालेले वार्षिक स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com