मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेत मनीष भालेकर यांचे यश
10791
महाराष्ट्र मास्टर्स
ॲथलेटिक स्पर्धेत
भालेकरांचे यश
तळेरे : मुंबई येथील सोमय्या विद्याविहार विश्वविद्यालयाच्या ॲथलेटिक ट्रॅकवर नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धेत मूळ चिंचवली (ता. कणकवली) गावचे सुपुत्र व सध्या वरळी मुंबई येथे वास्तव्यास असणारे मनीष भालेकर यांनी १ सुवर्ण व ३ रौप्यपदके जिंकत यशस्वी कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची जबलपूर (मध्यप्रदेश) येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भालेकर यांनी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीत ५०० मीटर जलद चालण्याच्या शर्यतीत रौप्य, लांब उडी स्पर्धेत सुवर्ण, ट्रीपल जंप जी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. याबरोबरच मिक्स रिले ४x१०० स्पर्धेमध्ये सांघिक द्वितीय क्रमांक प्राप्त केला. भालेकर हे उत्तम फुटबॉलपटू असून ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटसाठी राष्ट्रीय स्तरावरावर प्रतियोगितेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

